आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती:विधी सेवा प्राधिकरणातर्फे जागतिक सायकल दिनी रॅलीद्वारे जनजागृती

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय मुंबई यांचे निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय यांचे तर्फे शुक्रवार, दि. ३ जून रोजी जागतिक सायकल दिवस निमित्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. सदर रॅलीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष न्या. अनिल सुब्रमण्यम यांनी केले. यावेळी जिल्हा न्यायाधीश - १ जी. जी. भंसाळी, अतिरीक्त सह जिल्हा न्यायाधीश चव्हाण, दिवाणी न्यायाधीश एल. ए. बिडवई, मुख्य न्यायदंडाधिकारी डि. एस. थोरात, सह दिवाणी न्यायाधीश व्हि. एस. मडके, वकील संघाचे अध्यक्ष अमित बदनोरे, क्रिडा भारती सायकलिंग ग्रुपचे अध्यक्ष दिलीप राखे, पत्रकार सेवा संघाचे विजयकुमार बुंदेला तसेच मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, वकील, पॅरा विधी स्वंयसेवक, क्रिडा भारती सायकलिंग ग्रुप यांचे पदाधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी रॅलीत सहभाग नोंदविला. जिल्हा विधी सेवाचे प्रभारी सचिव न्या, एल. ए. बिडवई यांनी पर्यावरणाचा रास टाळण्यासाठी व आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सायकल चालविणे खुप गरजेचे असल्याचे यावेळी सांगितले. तर अनंत पांडे, यांनी तणाव मुक्त राहण्यासाठी सायकल घालवण्याबाबत फायदे याबाबतची माहिती दिली. ही सायकल रॅली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय येथून स्टेट बॅक चौक, पुनम चौक ते एलआयसी चौक व जिल्हा न्यायालय येथे संपन्न झाली. सदर रॅलीचे माध्यमातुन आरोपीचे अधिकार, लोकअदालत व विधी सेवा कायद्याबाबत असलेल्या माहितीचे फलक लावून जनजागृती करण्यात आली.दरवर्षी ३ जून रोजी जागतिक सायकल दिवस साजरा करण्यात येतो हा दिवस सायकलची वैशिष्ट्ये आणि उपयुक्त ओळखण्यासाठी तसंच त्याचा प्रसारासाठी साजरा केला जातो.

अनेक बाल खेळाडूंनी सायकली चालवत दारव्हा ते देऊळगाव वळसा येथे साजरी केली पिकनिक सहल क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारा चैतन्य ग्रुप ऑफ स्पोर्ट्सतर्फे शुक्रवार, दि. ३ जून रोजी छत्रपती श्री शिवाजी स्टेडियम दारव्हा येथे ठाणेदार सुरेश म्हस्के यांच्या हस्ते पिकनिक सहलीचे उद्घाटन झाले. या पिकनिक सहली मध्ये शहरातील जवळपास ७० मुलांनी भाग घेतला होता. यावेळी उद्घाटक ठाणेदार सुरेश म्हस्के, चैतन्य ग्रुपचे फुटबॉल मार्गदर्शक गणेश भोयर, औंकार निमकर, राम मते, अनिल लाभशेटवार यांनी सायकल चालवण्याचे महत्व सांगून आपले मत व्यक्त केले. त्यानंतर सर्व खेळाडू, सदस्य, पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथून सायकल द्वारे खेलही जीवन हे घोषवाक्य देत आपल्या सहलीला सुरुवात केली व जूना दिग्रस रोड मार्गे देऊळगाव वळसा येथे पोहोचले. देऊळगाव वळसा येथील आई महालक्ष्मीच्या मंदिरात पोहोचून पूजा आराधना करून भजन व प्रार्थना केल्या आणि लगतच्या पर्यटन केंद्रात बच्चे कंपनीनी मनमुराद आनंद लुटला. यावेळी चैतन्य ग्रुप या संघटनेच्या वतीने मुलांना नाश्ता व जेवन वितरित करण्यात आले. सदर जागतिक सायकल दिना निमित्त आयोजित सहली करिता गणेश भोयर, अनिल लाभसेटवार, गणेश दुधे, ओंकार निमकर, प्रा. राम मते, चंदू कनोजिया, प्रवीण भोयर, गोकुल जाधव, गजानन कसंबे, पुसांडे, ॲड. अभिजीत रोडे, सुनिल ठाकरे, ॲड. संदीप पाटील, अभिजीत बेलपत्रे, सिद्धार्थ भोयर, जय तिरमारे व सर्व चैतन्य ग्रुपचे सभासद उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...