आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुसद तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरांनी दुकान थाटले आहे. अशा बोगस डॉक्टरांच्या हातात रुग्णांची नाडी दिल्या जात आहे. अशा गंभीर बाबीकडे मात्र तालुका आरोग्य अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे वरिष्ठांनीच पुसद तालुक्याकडे लक्ष केंद्रित करून बोगस डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी आता जागृत जनतेकडून जोर धरत आहे. माळपठारावर हिवळणी, वसंतवाडी, मारवाडी,रोहडा, बेलोरा, वाघजाळी, मांजरजवळा, सत्तरमाळ, हनवतखेडा आदी ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस दुकान थाटले आहेत. तर कारवाईच्या भीतीने तर अनेक डॉक्टर घरोघरी जाऊन स्वस्त दरात उपचार करीत आहेत.
रात्री अपरात्री तात्काळ सेवा व तेही स्वस्त दरात मिळत असल्याने अशा बोगस डॉक्टरांच्या हातात रुग्णांची नाडी दिल्या जात असून त्यांच्या आरोग्याची खेळ मांडल्या जात आहे. ज्या डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करता येत नाही अशा डॉक्टरांकडून वेगवेगळ्या प्रकारचे औषधाची बॅगच घेऊन फिरत आहे. कितीही गंभीर आजारी असलेला रुग्णाची तपासणी देखील याच बोगस डॉक्टरांकडून केल्या जात आहे.
अशा गंभीर बाबीकडे मात्र तालुका आरोग्य अधिकारी जय नाईक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यांना अशा बोगस डॉक्टरांकडून हप्ते मिळत असल्याचे देखील तक्रारी ग्रामीण भागातील जनतेकडून लावल्या जात आहे. बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी वारंवार लेखी व तोंडी सूचना देऊनही तालुका आरोग्य अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडून कारवाई करीत नसल्याने त्यांच्यावर मनस्ताप व्यक्त करत आहे.
प्रशासनाने भरारी पथक नेमून बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी देखील जनतेतून होत आहे. यात विशेष बाब म्हणजे शहरातील नामांकित डॉक्टरांच्या दवाखान्यात प्रॅक्टिस करणारे कंम्पाऊंडरही स्वस्त दरात ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार करीत आहेत. त्यामुळे अशा निष्क्रिय तालुका आरोग्य अधिकाऱ्याची हकालपट्टी करावी अशी मागणी जागृत जनतेकडून जोर धरत आहे.
यादी चे काम सुरू
पुसद तालुक्यातील ग्रामीण भागातील ग्रामसेवक, सरपंच, तलाठी, तंटामुक्ती अध्यक्षासह गटविकास अधिकारी यांना कळवले आहे. ग्रामीण भागात बोगस डॉक्टर किती याची माहिती तेच देऊ शकतात. त्यामुळे यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतरच कारवाई करण्यात येईल. या आगोदर एक वर्षापूर्वी शेंबाळपिंपरी येथे बोगस डॉक्टरवर कारवाई केली होती. -जय नाईक, तालुका आरोग्य अधिकारी, पुसद.
जनतेच्या जिवाशी खेळ चालू
माळ पठारावर बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट सुटला आहे. प्रशासनाला वेळोवेळी विनंती करून सुद्धा दररोज जनतेच्या जिवाशी खेळ चालू आहे. प्रशासनाने तात्काळ या बाबीकडे लक्ष द्यावेत. दररोज जनता मृत्यूच्या तोंडाशी जाऊन उभे राहतात. प्रशासन मूग गिळून गप्प बसला आहे. माळ पठारावर बोगस डॉक्टरांवर कारवाई करावी.भोळ्या भाबड्या अज्ञानी असणाऱ्या जनतेतून सर्रास लूट करत आहे. -युवराज राठोड, सामाजिक कार्यकर्ता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.