आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचनामा:नदीच्या खोलीकरण कामाचा शेतकऱ्यांनी केला पंचनामा; बांधकामावेळी नियम धाब्यावर बसवून ही कामे केल्याची चर्चाही शेतकऱ्यांमधून होत आहे

वनोजा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेलूबाजार परिसरातील अडाण नदीवरील बंधारे निकृष्ट दर्जाचे असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी शासन दरबारी सुरू असूनही कंत्राटदारांनी याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. परंतु, हा विषय शेतकऱ्याच्या जिव्हारी लागला असून चांगल्या दर्जाची कामे व्हावीत, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. ठेकेदारांनी अडाण नदीवरील बांधकामावेळी नियम धाब्यावर बसवून ही कामे केल्याची चर्चाही शेतकऱ्यांमधून होत आहे.

याबाबत जलसंधारण मंत्री आणि राज्याचे अप्पर मुख्य सचिव जलसंधारण विभाग यांच्याकडे याबाबतची वस्तुस्थिती लेखी स्वरूपात मांडली असता ही कामे चांगल्या दर्जाची व्हावीत, ही अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. अखेर या कामावर देखरेख करणारे जलसंधारण विभागाचे उपविभागीय अधिकारी वाघमारे यांच्यासोबत चर्चा करून या बंधाऱ्यांचा उद्देश त्यांच्या लक्षात आणून दिल्यावर त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना बळ देऊन सदर काम करण्याचे आश्वासन दिले.

ठेकेदाराची मनमानी आता तरी अधिकाऱ्यांनी थांबवावी, अशीही मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. यावेळी योजनेचे मूळ संकल्प किशोर देशमुख व परिसरातील शेतकरी बाळू ठाकरे, रुपेश ठाकरे, धर्मराज राजूरकर, अशोक डाळ, अक्षय डाळ, माधव ठाकरे, उद्धव ठाकरे, दत्ता अंजनकर, गोपाळ गावंडे, पांडुरंग डाळ, महादेव गावंडे, चिंतामण काळे, सुनील सावके, रामचंद्र सुर्वे, दत्ता गावंडे, दत्ता बाईस्कर, प्रवीण येलकर यांच्यासह आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...