आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावतीकडे जात असलेल्या मालवाहू ट्रक व एसटी बसचा यवतमाळ ते अमरावती मार्गावर असलेल्या शिंगणापूर फाट्याजवळ भीषण अपघात झाला असून या अपघातात एका वयोवृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार, दि. ६ एप्रिलला दुपारी १२ ते १२.३० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात २४ प्रवाशी जखमी झाले असून चार ते पाच प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती नेर आगाराच्या आगार प्रमुख दीप्ती वड्डे यांनी दिली आहे. पांडुरंग खुशाल बोडखे वय ६५ वर्ष रा. कवठा बुद्रुक जि. अमरावती, असे मृत वृद्धाचे नाव आहे.
नेर तालुक्यातील पाथ्रड येथील प्रशीक खडसे वय २५ वर्ष, पिंपरी कलगाव येथील पार्वतीबाई पोहनकर वय ६५ वर्ष, सावणपुरा येथील मुमताज बेगम ७० वर्ष, पुसद येथील अरूणाबाई आमले ६५ वर्ष, प्रियंका सतीश दायमा २० वर्ष, अश्वीन प्रकाश जाधव २० वर्ष, सिद्धार्थ राजू धुळे, विजय पांडुरंग पत्रे वय २० वर्ष, सुरेखा इंगळे ४२ वर्ष, साक्षी गजानन उंबरकर वय १७ वर्ष यांचा तर वसंत वाहणे वय ४४ वर्ष, रोशन शहाकार वय ३८ वर्ष, अनिकेत नंदू राठोड १९ वर्ष, कुसुम पोहनकर वय ६९ वर्ष, वनिता खडसे वय ५० वर्ष, पंडित सुदाम कडेल ५६ वर्ष, वनिता आनंद मेश्राम ३६ वर्ष, प्रेमदास चव्हाण वय ४५ वर्ष, चेतन मुकेश सांगानी, सारिका भिडेकर, शालिनी गुजर वय ४२ वर्ष, बाळकृष्ण केशव काळे, तुषार भिडेकर, नरेश गुलाब छागाणी वय ५७ वर्ष अशी जखमींची नावे आहे.पुसद आगाराची एसटी बस क्रमांक एमएच-४०-वाय-५९२६ ही अमरावतीकडे सकाळी ८.१५ वाजता निघाली होती. पुसदवरून दिग्रस दारव्हा नेर मार्गे कर्मचारी प्रेमदास चव्हाण हे घेऊन जात असलेल्या बसला विरुद्ध दिशेने येणाऱ्या माल वाहु ट्रक क्रमांक एमएच-१६-एवाय-९७६७ याने जबर धडक दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.