आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेचा स्वाइन फ्लूने बळी:स्वाईन फ्ल्यूने पुसदच्या गर्भवतीचा नागपुरात मृत्यू;नागपूर एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

पुसदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काकडदाती ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या गर्भवती महिलेचा स्वाइन फ्लूने बळी घेतल्याची खळबळजनक घटना मंगळवार, दि. ६ सप्टेंबर रोजीच्या १२.३० वाजता दरम्यान नागपूर येथील एम्स रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. प्रणिता वैभव वट्टमवार वय ३२ वर्षे, रा.काकडदाती, असे मृत्यू झालेल्या गर्भवती महिलेचे नाव आहे. प्रणिता ही सहा महिन्याची गर्भवती होती. अशात सर्दी, खोकला, ताप झाल्याने पुसद येथील खासगी रुग्णालयात महिलेला उपचारासाठी भरती केले होते.

भरती केल्यानंतर प्रणिताचे सर्व तपासण्या केल्या असता तपासणीमध्ये स्वाइन फ्लूचा आजार समोर आला. प्रकृती बिघडल्याने पुढील उपचारांकरिता नागपूर येथील एका खासगी रुग्णालयामध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर वट्टमवार कुटुंबीयांनी नागपूर येथील एका खासगी दवाखान्यात उपचारांकरिता दाखल केले, परंतू प्रकृती चांगलीच खालावल्याने एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यास सुचविले. या रुग्णालयात बेड करीता आमदार इंद्रनील नाईक यांनी पुढाकार घेतला. डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, प्रणिताची मंगळवार, दि. ६ सप्टेंबर रोजीच्या रात्री प्राणज्योत मावळली. प्रणिताला पती, दोन मुली, सासू, सासऱ्यासह आप्त परिवार आहे.

सर्दी, खोकला, ताप असल्यास तपासण्या करा
सर्दी, खोकला, ताप झालेले नागरिक स्वतःच एखादी गोळी घेतात. आवश्यक असलेल्या चाचण्या, तपासण्या देखील टाळतात. ज्यांना सर्दी, खोकला, ताप असेल अशांनी डॉक्टरांशी सल्ला घेऊन योग्य उपचार करावे. स्वाईन फ्लूचा आजारावर वेळेवर उपचार केल्यास बराही होऊ शकतो. त्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी. त्या गर्भवती महिलेला एच १, एन १ आजार झाल्याची माहिती मिळाली होती.
डॉ. मनीष पाठक

बातम्या आणखी आहेत...