आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वास्तव:वातावरणातील बदलामुळे रब्बी हंगामाच्या पेरण्यांना लागला ब्रेक

यवतमाळ11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा उशीरापर्यंत कोसळलेल्या पावसाने थंडीच्या वातावरणात अमुलाग्र बदल झाला आहे. याचा विपरीत परिणाम रब्बी हंगामाच्या लागवडीवर पडला आहे. आतापर्यंत रब्बी हंगामात केवळ ४१ टक्के पेरण्या आटोपल्या असून, सर्वांधिक ८७ हजार ९५५ हेक्टरवर हरभरा लागवड झाली आहे. विशेष म्हणजे गतवर्षी ६० टक्क्याहून अधिक पेरण्या आटोपल्या होत्या.

यंदा सरासरीहून अधिक पाऊस कोसळला. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्हाभरातील शंभराहून अधिक महसुली मंडळात अतिवृष्टी झाली. खरीप हंगामात एकूण लागवडीच्या ६० टक्के नुकसान झाले. शासनाने मदत जाहीर केली, परंतू मदत निधी वाटपाला विलंब झाला. बहुतांश नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही. नुकसानीचे पंचनामे करताना तलाठ्यांनी हयगय केली.

आता मदत निधीच्या याद्या सुद्धा बराच घोळ झाला. अशा परिस्थितीत खऱ्या लाभार्थ्यांना मदतनिधीपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे रब्बी हंगामावर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रीय केले आहे. कृषी विभागाने रब्बी हंगामाचे नियोजन केले. यात एकूण दोन लाख सहा हजार ७१० हेक्टरवर रब्बी हंगामाची लागवडीचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने हरभरा एक लाख ४५ हजार हेक्टर, गहू ४५ हजार, ज्वारी दोन हजार ५००, तर मका एक हजार दोनशे, इतर बारा हजार ८५० हेक्टर पिकांचे नियोजन केले आहे. त्यात सार्वजनिक, खासगी, असे मिळून ७५ हजार ९८० क्विंटल हरभऱ्याचे बियाणे, गव्हाचे

यंदा मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध
गतवर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत रब्बी हंगामाची लागवड ६० टक्क्याहून अधिक झाली होती. त्या तुलनेत यंदा पेरणीची टक्केवारी कमी आहे. सर्वांधिक हरभऱ्याची लागवड झाली आहे. येत्या काळात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उर्वरीत पेरण्यासुद्धा येत्या काळात पूर्ण होतील. जिल्ह्यात मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध आहेत.- नवनाथ कोळपकर, जिल्हा कृषी अधिक्षक, यवतमाळ.

गतवर्षीही झाली होती हरभऱ्याची सर्वाधिक लागवड
रब्बी हंगामात सर्वाधिक पेरा हरभऱ्याचा आहे. मागिल वर्षी एक लाख १६ हजारांहून अधिक हेक्टरवर हरभरा पिकाची लागवड झाली होती. त्यामुळे यंदा ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बियाण्यांची मागणी सुद्धा मुबलक प्रमाणात करण्यात आली आहे. सध्या महाबीजचे ३६ हजार क्विंटल, तर उर्वरीत खासगीचे बियाणे उपलब्ध आहे.

थंडीचे प्रमाण वाढताच पेरण्या पूर्ण होतील
रब्बी हंगामातील पिकांना थंडी आवश्यक आहे. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर काही दिवस थंडीचा जोर वाढला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुरूवातीला काहीअंशी पेरण्या आटोपून घेतल्या. मध्यंतरी थंडी गायब झाल्याने उर्वरीत पेरण्या खोळंबल्या आहेत. येत्या काळात पुन्हा थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उर्वरीत पेरण्या लवकरच होतील.- राजेंद्र माळोदे, कृषी विकास अधिकारी, यवतमाळ.

बातम्या आणखी आहेत...