आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ की यादे:शरद संगीत संघाद्वारे रफी की यादे कार्यक्रम

यवतमाळ7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ की यादे कार्यक्रम पेशवे प्लॉट, माळीपुरा व महावीर नगर येथील रसीक प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पाडला. सर्व प्रथम मो. रफी यांच्या प्रतिमेला सर्वांनी पुष्प अर्पण केले.

यावेळी नंदकुमार महाजन यांनी न फनकार तुझसा तेरे बाद आया, मोहम्मद रफी तु बहुत याद आया हे गीत गावून श्रद्धांजली अर्पण केली. नंतर सुरेश लोहाणा, अनिल पकाले, विजय गुलालकरी, वृषाली गव्हाणे, मंजुषा आगरकर, अंजली गवारे, हेमा राऊळकर, वर्षा पकाले, अरुण पकाले, रवींद्र कहाते, पूनम शहाकार, सरीता महाजन, माधुरी जैन यांनी रफी साहेबांची सदाबहार गीते सादर करूण श्रद्धांजली वाहिली. विजय भुसारी व प्रिया डाखोडे यांनी मो. रफी वर रचलेल्या कवितेचे वाचन केले. कार्यक्रमाकरीता राजेश इंदाणे, पेशवे प्लॉट यांनी आपल्या निवासस्थानी कार्यक्रमाची संपूर्ण व्यवस्था केली. या कार्यक्रमा करीता हेमराज बंड, हेमलता इंदाणे, वर्षा नखाते यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...