आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोंबड बाजार:कोडपाखंडी जंगलातील कोंबड बाजारावर धाड; पाच जण ताब्यात

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोंबड बाजारावर धाड टाकून पाटण पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेवून जवळपास दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवार, दि. १ जानेवारीला पाटण पोलिसांनी कोड पाखंडी जंगल परिसरात करण्यात आली. अनिल खडसे वय ३७ वर्ष रा. कोड पाखंडी ता. झरी, सचिन बावणे वय ३७ वर्ष रा. सुभाष नगर आदिलाबाद, गोपाल आत्राम वय २४ वर्ष रा. कृष्णापूर ता. केळापूर, जिवन चंदेल वय २४ वर्ष रा. घोन्सी ता. केळापूर आणि शुभम आत्राम वय २८ वर्ष रा. खडक डोह ता. झरी अशी ताब्यात घेण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहे.

या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाटण पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या ग्राम कोड पाखंडी येथील जंगलात मोठ्या प्रमाणात कोंबड बाजार सुरू होता. याबाबतची गोपनीय माहिती ठाणेदार संदीप पाटील यांना मिळाली. त्यावरून रविवारी पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सापळा रचून ग्राम कोड पाखंडी येथील जंगलातील कोंबड बाजारावर धाड टाकली. यावेळी पाच जुगारी पोलिसांना आढळून आले.

त्यांच्याकडून दोन कोंबडे, काती, दोन दुचाकी आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख ३२ हजार ७४० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण ठाणेदार संदीप पाटील, पथकातील कर्मचारी सुरेश राठोड, अमीत पोयाम, संदीप सोयाम, प्रशांत तलांडे, रत्नाकर सलामे यांनी पार पाडली.

बातम्या आणखी आहेत...