आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धाड:कोंबड बाजारावर धाड, सात जणांना पकडले

यवतमाळ13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोंबड बाजारावर धाड टाकून मुकुट बन पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेत जवळपास सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवार, दि. १८ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अडेगाव शेत शिवारात करण्यात आली. अमोल मत्ते वय ४२ वर्ष रा. आनंद नगर, वणी, सुनील आवारी वय ४८ वर्ष रा. अडेगाव ता. झरी, बाबाराव हिवरकर वय ४८ वर्ष रा. अडेगाव, शिवराम गिरसावळे वय ६० वर्ष रा. डोंगरगाव ता. झरी, वामन धानोरकर वय ४० वर्ष रा. अडेगाव, विठ्ठल झाडे वय ५१ वर्ष रा. अडेगाव आणि नीलेश आत्राम वय ३१ वर्ष रा. रामपूर ता. झरी अशी ताब्यात घेण्यात आलेल्या सात जणांची नावे आहे.

या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, मुकुट बन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अडेगाव शेत शिवारात सार्वजनीक जागेवर कोंबड बाजारावर हारजीतचा खेळ सुरू होता. याबाबतची गोपनीय माहिती मुकुट बन ठाणेदार अजीत जाधव यांना मिळाली. त्यावरून शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मुकुट बन पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार करीत त्या कोंबड बाजारावर धाड टाकण्यात आली.

यावेळी सात जणांना ताब्यात घेत दोन कोंबडे, रोख रक्कम, सात दुचाकी असा एकूण २ लाख १२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी मुकुट बन पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, वणी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल सकवान, खुशाल सुरपाम, पुरूषोत्तम घोडाम पथकातील संजय खांडेकर, संदिप कुमरे यांनी पार पाडली.

बातम्या आणखी आहेत...