आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरालगत असलेल्या चिखलगांव येथील एका ले-आऊटमध्ये किरायाच्या घरात सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी धाड टाकून क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा घेणाऱ्या चार जणांना अटक केली. घटनास्थळावरून पोलिसांनी जवळपास पावणे नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यवतमाळ पोलिसांनी वणी येथील मटक्यावर टाकलेल्या धाडी नंतर शहर पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर धाड टाकून वणी पोलिसांनी अवैध धंद्यांविरुद्धची आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
संदीप नारायण देवगडे वय ३४ वर्ष रा. चिखलगांव, सौरभ राजेंद्र मिश्रा वय २८ वर्ष रा. वरोरा, शिवदास संभाजी तडस रा. वरोरा आणि अब्दुल छनील अब्दुल वाहिद शेख वय ३५ वर्ष रा. सुराणा ले-आऊट वणी अशी ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांची नावे आहे.
वणी तालुक्यातील चिखलगांव येथील सुराणा ले-आऊटमधील एका किरायाच्या रूममध्ये आयपीएल क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा घेतला जात असल्याची ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांना विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली. ठाणेदारांनी सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण हिरे यांच्यासह पोलिस पथक तयार करून खुराणा ले-आऊटमधील त्या घराजवळ सापळा रचला. घराचा चारही बाजूंनी ताबा घेत खिडकीतून घरात डोकावून पहिले असता त्या ठिकाणी काही व्यक्ती आयपीएल क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा घेतांना आढळले.
पोलिसांनी अतिशय शिताफीने त्या रूममध्ये प्रवेश करून आयपीएल क्रिकेट सट्ट्याची ऑनलाईन उतारवाडी घेणाऱ्या चार जणांना रंगेहाथ अटक केली. मंगळवारी लखनऊ सुपर जॉईंट विरुद्ध गुजरात टायटन्स या संघादरम्यान सामना होता. या प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.