आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुद्देमाल जप्त:पाटणबोरीतील मटका अड्ड‌्यावर धाड, लाखोंचा मुद्देमाल जप्त

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मटका अड्ड‌यावर एलसीबी पथकाने धाड टाकून लाखो रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथे मंगळवार, दि. १३ डिसेंबरला करण्यात आली. या प्रकरणी अमीन अली जाटु वय ३७ वर्ष रा. बोरी, अभय दुमनवार वय ३७ वर्ष रा. टाकळी केळापूर, अमजद अहेमद खान वय ३८ वर्ष रा. चंद्रशेखर वार्ड पांढरकवडा, शैलेंद्र रेड्डी वय ३२ वर्ष रा. पिपरवाडा अदिलाबाद, रवींद्र शिरपूरे वय २७ वर्ष रा. चांदा अदिलाबाद अशी ताब्यात घेण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहे.

या कारवाईत एलसीबी पथकाने १७ हजार ६२० रूपयाची रोख, मटका साहित्य, दोन दुचाकी आणि तीन मोबाईल असा एकूण १ लाख २ हजार ६२० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. हा मटका अड्डा मोनू पवार (ठाकुर) याचा असल्याचे पोलिस कारवाईत समोर आले आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक अमोल मुडे, पोलिस उपनिरीक्षक योगेश रंधे, पथकातील महेश नाईक, सुधीर पिदुरकर, रजनीकांत मडावी, समिष फुके यांनी पार पाडली.

बातम्या आणखी आहेत...