आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:शहरातील मटका अड्ड्यावर धाड, आठ जणांवर कारवाई

यवतमाळ11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील लोहारा आणि शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मटका अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून आठ जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवार, दि. २१ नोव्हेंबरला करण्यात आली.

कुणाल कंगाले रा. कोटंबा, प्रभाकर ठाकरे रा. वंजारी फैल, अनिल टेकाम रा. कळंब, सुरेश कुभलकर रा. मुबारकपूर बाभुळगाव, हंसराज कटके रा. वाघापूर, सागर माहुरे रा. देवी नगर, पवन यादव रा. चापडोह आणि विलास गायकवाड रा. नेताजी नगर आदींना ताब्यात घेवून २९ हजार ६२० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...