आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील प्रख्यात डॉक्टरांच्या रुग्णालयावर अवैध सावकारी करत असल्याप्रकरणी छापा टाकण्यात आला आहे. सावकारी प्रकरणातील २५ दस्तऐवज जिल्हा स्तरीय सावकारी नियंत्रण पथक व सावकाराचे निबंध तथा सहाय्यक निबंध कार्यालयाने दि. १ डिसेंबरला सकाळीच धाड टाकून जप्त केले आहे. डॉक्टरांच्या रुग्णालयावर धाडीची कारवाई झाल्याने शहरात एकच चर्चा रंगू लागल्या आहे. डॉ. आशिष कदम (रा. कदम हॉस्पिटल) असे कारवाई करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे.
या प्रकरणी प्राप्त माहितीनूसार, जिल्हास्तरीय सावकारी नियंत्रण पथक व सावकाराचे सहाय्यक निबंधक तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाने दि. १ डिसेंबरला डॉ. आशिष कदम यांच्या राहत्या घरी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ अन्वये अधिकाराचा वापर करुन घर झडती घेतली. झडती दरम्यान अवैध सावकारी संदर्भात २५ संशयास्पद दस्तावेज सापडले असता, जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, डॉ. वडते यांचे व माझे मैत्रीचे संबंध आहे. मित्र संबंधांमुळे त्यांना त्यांच्या एका प्रकरणाकरिता दहा लाख रुपये दिले होते. त्यांनी व्यावहारिक संबंधातून आरोप केले आहे. त्यांना व्याजाने पैसे दिले नाही. कुठलेही संशयास्पद दस्तऐवज आढळलेले नाही. माझ्या खरेदीचे असलेले कागदपत्रे अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे, असेही कदम यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.