आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्युत पुरवठा:महागाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह बरसला धुव्वाधार ; अनेकांच्या घरावरची टीनपत्रे उडाली

महागाव21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महागाव तालुक्यात गुरुवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने घरावरची टिनपत्रे उडाली, तर अनेक ठिकाणी झाडे पडल्याने तसेच विजेचे खांब पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तळपळत्या उन्हाने अंगाची लाही लाही होत असताना गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान महागाव शहरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने व गारपिटीसह हजेरी लावली असून या अचानक झालेल्या पावसाने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला झाला मात्र या पावसाने शेतकरी, व्यावसायिक व नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे शेतातील भाजीपाला व अन्य पिकांसह फळबागांचे नुकसान झाले आहे, तर घरांवरील टिनपत्रे उडाल्याने नागरिकांचे नुकसान झाले. तसेच तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे पडली, तर अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. राष्ट्रीय महामार्गावर झाड कोसळल्याने वाहतुक दिड तास ठप्प : अवकाळी वादळी वाऱ्यामुळे करंजखेड व कलगाव फाट्यावर दोन्ही ठिकाणी राष्ट्रीय महामार्गावर बाभळीचे झाड पडल्याने जवळपास दीड तास वाहतुक ठप्प झाली असतानाही वाहतुक सुरळीत करण्यात न आल्याने महामार्ग प्राधिकरणाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका वाहनधारक व प्रवाशांना बसला होता.

बातम्या आणखी आहेत...