आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पुरुष गटात रजपूत तर महिला गटात जगदंबा मंडळाची बाजी; दारव्हा येथे बंजारा लेंगी स्पर्धेला प्रतिसाद

दारव्हा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरोमणी संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या लेंगी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत पुरुष गटात रजपूत बंजारा लेंगी मंडळ भोपापूर तर महिला गटात जगदंबा महिला मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेचे उद्घाटन अॅड. शंकरराव राठोड यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पी. बी. आडे होते. पोहरादेवी येथील संत कबिरदास महाराज, डॉ. प्रियंका राठोड, डॉ. निशांत चव्हाण, प्रा. चरण पवार, कल्पना आडे, माणिक राठोड, अॅड. भीमराव जाधव, पल्लवी आडे, उत्तमराव जाधव, हरिश्चंद्र राठोड, देवराव राठोड उपस्थित होते.

संत कबिरदास महाराज यांनी आशीर्वादपर मार्गदर्शन केले. समाजातील मुलामुलींनी शिक्षणाला अग्रक्रम देऊन शेती, उद्योगातही जिद्दीने समोर येण्याचे आवाहन पी. बी. आडे यांनी केले. विदर्भातील अनेक महिला व पुरुष लेंगी मंडळांनी स्पर्धेत सहभाग घेतला. बक्षीस वितरण डॉ. निशांत चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. शाईन शेख व दत्तराम आडे यांच्या बंजारा गीताने सांगता झाली. सूत्रसंचालन विनोद राठोड, दादुसिंग चव्हाण यांनी केले, तर आभार रत्नदीप पवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. मनोज राठोड, भरत जाधव, दिलीप नाईक, ज्ञानेश्वर चव्हाण, गणेश वडते, राम उत्तम जाधव, मनोज शेषराव राठोड, देवानंद पवार, रमाकांत चव्हाण, रुगवेद राठोड, विजय जाधव, दयाराम जाधव आदींनी परिश्रम घेतले.

उर्वरित विजयी मंडळामध्ये खालील मंडळाचा समावेश होता. त्यामध्ये पुरुष गटात द्वितीय सेवालाल नंदिकेश्वर लेंगी मंडळ भुली, त्रुतीय श्री संत नथुसिंग महाराज लेंगी मंडळ डोल्हारी (देवी) चतुर्थ संत सेवालाल लेंगी मंडळ वरोली, तर पाचवे बक्षीस जय भानुदास बंजारा लेंगी मंडळ बोरगाव दाभडी आणि महिला गटात द्वितीय सामकी माता लेंगी मंडळ बोरनगर यांनी पटकावले. उत्कृष्ट संघाचे बक्षीस जय सेवालाल लेंगी मंडळ खापरदरी यांना देण्यात आले. डॉ. निशांत चव्हाण यांच्यातर्फे स्पर्धेतील सर्व सहभागी लेंगी मंडळांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...