आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजपूत समाजाने तलवारीची भाषा सोडून शिक्षणाला अधिक प्राधान्य द्यावे, जेणेकरुन समाज आर्थिक व ज्ञानाने संपन्न होईल, असे मौलिक मार्गदर्शन ॲड. अनिलसिंह ठाकूर यांनी तर समाजाने गटा-तटाच्या वादात न पडता एकसंघ व्हावे असे प्रतिपादन सुरेश सिंह गहेरवार यांनी येथील क्षत्रिय राजपूत समाज समितीद्वारे आयोजित महाराणा प्रतापसिंह जयंती कार्यक्रमात बोलतांना केले. क्षत्रिय राजपूत समाज समितीद्वारे निवृत्त अभियंता भवनात गुरूवार, दि. २ जून रोजी, महाराणा प्रतापसिंह जी यांच्या ४८२ व्या जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जयंती दिनी मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला राजपूत चेतना मंच नागपूरचे सामुहिक विवाह मेळाव्याचे प्रमुख महावीर सिंह बैस, रणजीतसिंह भारद्वाज, भारतसिंह बैस, चंद्रकांतसिंह चंदेल उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष रघुवीर सिंह चौहान यांनी संघटनेच्या मागील तीस वर्षाच्या वाटचालीचा धावता आढावा घेत अतिथींचा परिचय करून दिला. कार्यक्रमा दरम्यान वैदेही मनोज सिंह चौहान या बालिकेने राजपुती घुमरनृत्यासह विविध प्रकारचे कला प्रदर्शन सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. त्याबद्दल वैदेहीचे उपस्थितांनी कौतुक करीत अतिथींनी तिचे स्वागत केले. यावेळी शौर्यसिंह चौहान, दर्शन सूर्यवंशी, तनीष चौहान या बालकांनीही कलेचे प्रदर्शन करुन वाहवा मिळविली. प्रारंभी समितीच्या पदाधिकारी सदस्यांनी अतिथींचा शाल - पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. कार्यक्रमाचे सुंदर संचालन समितीचे सचिव डी. पी. सिंह यांनी केले. तर आभार महेंद्र प्रतापसिंह भदोरिया यांनी केले. समितीचे उपाध्यक्ष विजयसिंह सेंगर, दिनेशसिंह गहेरवार, सहसचिव नरेंद्र सिंह सेंगर, ॲड. अप्रेशसिंह खतवार, कोषाध्यक्ष निश्चल सिंह गौर, गणेशसिंह कछवाह, डॉ. गोपालसिंह गौर, रघुवीरसिंह बैस, कैलाशसिंह बैस, योगेशसिंह बिसेन, पंचमसिंह सदस्वार, संतोषसिंह चौहान, हंसराजसिंह सोमवंशी, ज्वालासिंह सरस्वार, बाबुसिंह चौहान, मनोजसिंह चौहान, मुन्नासिंह गहेरवार, संतोषसिंह गौर, निलजसिंह चौहान, प्रतिकसिंह चौहान, हिरासिंह चौहान, अभयसिंह राठौर, नरेंद्रसिंह चंदेल, दुर्गासिंह गहेरवार, उदयसिंह सोमवंशी यांच्यासह राजपूत समाजातील अनेक पुरूष व महिला, मुले उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.