आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृत महोत्सव:स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रॅली

पुसद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपरिषद द्वारा संचालित विश्वनाथ सिंह बयास माध्यमिक व उच्च माध्यमिक हिंदी विद्यालयाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्य प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. प्रभात फेरी शाळेपासून शहरातील न्यायालय समोरून गोधाजी मुखरे चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, नगीना चौक, महात्मा गांधी चौक, वसंतराव नाईक चौक मार्गे शाळेत समारोप करण्यात आला.

प्रभात फेरी मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक शैलेश अवस्थी, शिक्षिका सुरेखा मोगरे, उषा जवंजाळ, राजेश सिंह, रेखा वायकोस, गिरधारी पाण्डेय, रत्नमाला कजबे, नेहा राय, संगीता मेहेत्रे, प्राची राठोड, संजीवनी चव्हाण, मिलिंद गंगशेट्टीवार, विकास पांडे, नविन गुप्ता, रमेश रेवनवार, रामचंद्र मद्दी, शंकर वाघमारे व प्रशांत पाण्डेय शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने ही रॅली पार पडली.

बातम्या आणखी आहेत...