आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमजान:रमजान हा जीवनात अमुलाग्र बदल आणणारा महिना : मौलाना युनूस

फुलसावंगी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इतर संपूर्ण वर्ष ज्या वस्तूचा वापर हा वैद्य करार दिला गेला आहे. त्या मधील अनेक वस्तू या रमजान महिन्यात काही वेळे पुरते निषिद्ध मानल्या जातात. ते केवळ अल्लाहच्या आदेशामुळे तुमच्या अंगी ईश परायंता यावी, ह्या मागील उद्देश असुन रमजान महिना हा जीवनात इस्लाम प्रमाणे अमुलाग्र बदल आणण्याचा महिना असल्याचे प्रतिपादन जमियत उलेमा- ए- हिंदचे जिल्हा अध्यक्ष मौलाना युनूस यांनी फुलसावगी येथे रमजान महिन्याची महिती व स्वागतार्ह कार्यक्रमात बोलतांना वक्त केले.

रविवार पासून मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्याची सुरुवात होत आहे. या महिन्याची इस्लाम मध्ये मोठी महानता सांगितली गेली आहे. पवित्र कुराणात याच महिन्यात कुराण अवतरित झाल्याचा उल्लेख आहे ही एकच बाब रमजान महिन्याची महानता दर्शवण्यासाठी पुरे आहे. रमजान महिन्यात रोजे (उपवास) हे सर्वाना अनिवार्य करण्यात आले आहे. उपवास ठेवण्याचा आदेश देताना तुमच्या अंगी ईश परायंता यावी या साठी तुमच्या आधीच्या लोका प्रमाणे तुमच्या वर सुद्धा रोजे अनिवार्य केले गेले असल्याचा स्पष्ट उल्लेख पवित्र कुराण मध्ये केला गेला आहे.

मुस्लिम समाजाच्या जीवनात मोठे महत्त्व असलेल्या महिन्याची सुरुवात ही रविवार पासून होत आहे. त्या आधी शुक्रवारी सायंकाळी ह्या महिन्या बद्दल कुराण मध्ये आलेले आदेश व प्रेक्षितांनी दिशा निर्देश या विषयावर फुलसावगी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्या मध्ये मुख्य वक्ते म्हणून मौलाना युनूस हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मो मुसद्दीक यांनी सादर केले, कुराण पठण हाफिज सादिक बावानी यांनी सादर केले तर फातेम मो मुसद्दीक या चुमुकली ने सूंदर आवाजात प्रेक्षित स्तवन ( नात) सादर करून कार्यक्रमाला एका नवीन उंची पर्यंत नेले या कार्यक्रमाचे संचलन हाफिज सुफयान खान यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने महिला व पुरुषांनी हजेरी लावली होती.

बातम्या आणखी आहेत...