आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरापासून जवळच असलेल्या वरुड पेट्रोल पंपावर आयशर चालकाने व त्याच्या एका साथीदाराने संगनमत करून दि. ४ मार्च ते ५ मार्चच्या मध्यरात्री २१ हजार रुपयाची डिझेल भरले. त्या मोबदल्यात चौदा हजार रुपयांची रक्कम दिली. उर्वरित सात हजार रुपयांची मागणी केली असता वाद निर्माण केला. त्यानंतर आयशर चालकाने भरधाव वेगाने वाहन चालत पोबारा केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आयशर चालका विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. एसबी जयस्वाल पेट्रोलियम वरुड येथील काम करणारा कर्मचारी गोपाल प्रेमसिंग जाधव वय २६ वर्ष रा. नंदपूर मोहा यांनी दिलेल्या तक्रारीवरून आयशर क्रमांक एमएच-२९-बीई-५६८०च्या चालकासह त्याच्या एका साथीदारा विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या वरुड येथील एबी जयस्वाल यांच्या पेट्रोल पंपावर आयशर चालकाने एकवीस हजार रुपये किमतीचे २३३.३८ लिटर डिझेल भरले होते. आयशर चालकाने १४ हजार रुपये दिले. उर्वरित सात हजार रुपयाची मागणी केली असता वाद निर्माण केला. त्यानंतर पैसे नसल्याचे सांगून तुला काय करायचे ते करून घे अशी धमकी देत शिवीगाळ केली. दरम्यानच्या वेळेला आयशर चालकाने पोबारा केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.