आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. जिल्ह्यात मुदत संपलेल्या शंभर ग्रामपंचायतीसाठी रविवार, १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर मंगळवार, २० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. विशेष म्हणजे सरपंचाची थेट जनतेतून निवड होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका प्रमुख पक्षासाठी सराव परीक्षाच राहणार आहे.
जिल्ह्यातील ७३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका काही महिन्यांपूर्वी झाल्या. दरम्यान, शिल्लक राहिलेल्या १०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या १८ डिसेंबरला मतदान होणार असून, २८ नोव्हेंबर ते दि. २ डिसेंबर ह्या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे.
विशेष म्हणजे ओबीसी आरक्षण, राज्यातील बदललेल्या सत्ता-समीकरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित केलेल्या आहेत. निवडणूक विभागाने केलेली प्रभागरचना, आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेवर प्रशासक आहेत. ग्रामपंचायतींच्या तिसऱ्या टप्प्यातील सार्वत्रिक निवडणुका काही महिन्यांपूर्वीच झाल्या.
जिल्ह्यातील तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या
आर्णी तालुक्यात सात, बाभूळगाव एक, दारव्हा आठ, दिग्रस पाच, घाटंजी सहा, मारेगाव नऊ, नेर एक, पुसद १२, राळेगाव आठ, उमरखेड चार, वणी १९, यवतमाळ १६, झरी जामणी तालुक्यातील चार, अशा मिळून १०० ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी कंबर कसली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.