आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ:औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ‘रासेयो’चे पाच दिवसीय श्रमसंस्कार शिबिर उत्साहात

शिबिर उत्साहात3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या पाच दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन रविवार, दि. २० मार्च रोजी दारव्हा तालुक्यातील चिकणी जि. प. उच्च प्राथमिक मराठी शाळेत मोठ्या उत्साहात पार पडले.

यावेळी उद्घाटनास प्रमुख अतिथी म्हणून रेमंड युको डेनिम कंपनीचे वर्क डायरेक्टर नितीनकुमार श्रीवास्तव, यवतमाळ जिल्हा इंडस्ट्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष श्याम सिंधी, जय ऍग्रो इंडस्ट्रीजचे कार्यकारी व्यवस्थापक ज्ञानेश्वर खताडे, ग्रामपंचायत चिकणीच्या सरपंच आशा ढोंगे, चिकणीच्या मुख्याध्यापिका विजया चवरडोल, नाना ढोंगे, शाळा सुधार समितीचे अध्यक्ष विलास पाढेन यांची प्रमुख उपस्थिती होती.

उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी महेश कुमार सिडाम यांनी भूषविले. संस्थेचे प्राचार्य प्रमोद भंडारे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे ध्वजारोहण करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची संपूर्ण पार्श्वभूमी, ब्रीदवाक्य व बोधचिन्ह यांचे स्वरूप, उद्देश व रूपरेषा स्पष्ट करून या शिबिरासाठी सर्व प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा दिल्या. प्रमुख अतिथी नितीनकुमार श्रीवास्तव यांनी शिबिराचे उद्घाटन करून प्रशिक्षणार्थींना या राष्ट्रीय कार्यात आपल्या मनाची शक्ती वाढवून स्वतःला समर्पित भावनेने झोकून देण्या बाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश कुमार सिडाम यांनी औ.प्र. संस्थेच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक करून शिबिरात सहभागी प्रशिक्षणार्थींना सेवा आणि त्याग यांचा मूलमंत्र दिला. या शिबिरा द्वारे प्रशिक्षणार्थींमध्ये स्वयंशिस्त, समाजसेवा, मूल्यशिक्षण, सामाजिक जाणीव तसेच राष्ट्र व समाजाप्रती जबाबदारीने कार्य करणारा स्वयंसेवक तयार होईल असा विश्वास महेशकुमार सिडाम यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.विजया चवरडोल यांनी शिबिरासाठी संपूर्ण सहकार्य करण्याची आणि यामुळे शाळेचा परिसर व शाळा यांना नक्कीच फायदा होईल असे मनोगत व्यक्त केले . माजी सरपंच नानाभाऊ डोंगे यांनी आपल्या गावासाठी अशा प्रकारचे शिबिर ही एक आनंदाची बाब असून शिबिरासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

या उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन मोनिका नाईक, लीना वाघमारे तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी संजय पोटे यांनी केले. उद्घाटन कार्यक्रमास संस्थेतील बहुसंख्य निदेशक, कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...