आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील शेळगाव अटोळ येथे २ एप्रिल शनिवार रोजी रेशनकार्ड वितरण शिबिराचे आयोजन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते.
या शिबिरात नवीन रेशनकार्ड काढणे, दुय्यम रेशनकार्ड काढणे, रेशनकार्डमधून नाव वेगळे करुण नवीन कार्ड देणे, रेशनकार्ड मधून नाव कमी करणे, रेशनकार्डमध्ये नवीन नाव समाविष्ट करणे इत्यादी सेवा देण्यात आल्या.परिसरातील शेळगाव आटोळ, मंगरुळ, इसरूळ, मिसाळवाडी, आमोणा, अंचरवाडी, कोनड, देऊळगाव घुबे इत्यादी गावातील शेकडो नागरिकांनी या शिबिरात सहभाग नोंदवून रेशनकार्ड संदर्भातील प्रलंबित असलेली आपली काम पूर्ण करून घेत शिबिराबाबत समाधान व्यक्त केले. याप्रसंगी पुरवठा विभागाचे निरीक्षक अधिकारी सुनील झाल्टे, ए.के.फुड,शेखर सुरडकर, रेशनकार्ड लिपिक शेटे, सचिन भुतेकर, ऑपरेटर भागवत मंडळकर, सचिन दिवटे, तलाठी भूतेकर, सचिव रिंढे, सोळंकी, राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा जिल्हाध्यक्ष तथा रेशन दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष राजीव जावळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा मेरा खु सर्कल चे राष्ट्रवादी नेते डॉ. विकास मिसाळ, सुरेश पाटील भूतेकर, रा. यु. कॉ. तालुकाध्यक्ष कृष्णा मिसाळ, देवानंद गवते, बाळू पाटील मिसाळ, सुरेश राजे, संतोष बोर्डे, बाजीराव देशमुख, कैलास बोर्डे, वनिता मिसाळ, संतोष अटोळे,शरद बोर्डे, पांडुरंग देशमुख, वसंतराव बोर्डे, रामराव बोर्डे, सतिश भूतेकर, गजानन परिहार,डॉ. शिवदास भांदर्गे, गजानन जावळे, एकनाथराव परिहार, पांडुरंग पांडे, अनिल अरबुने, राहूल मिसाळ, बबन इंगळे, विनोद बांबल, मारोती शिवरकर आदी रेशन दुकानदार उपस्थित होते.या शिबिराच्या यशस्वितेसाठी तहसीलदार डॉ.अजितकुमार येळे यांचे मार्गदर्शन लाभले. तर यशस्वितेसाठी परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेळगाव आटोळ ग्रामपंचात पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.