आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंटामुक्ती:आदर्श ग्राम वनोजाच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी राऊत

वनोजा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यापासून परावृत्त करणे व गावातील तंटा गावातच समोपचाराने मिटावे या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने सन २००७ पासून सुरु केली.सोमवारी १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत आदर्श ग्राम वनोजा येथे ग्रामसभा पार पडली. ग्रामसभेमध्ये विविध विषय घेण्यात आले.

सोबतच ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष निवडीचा विषय हा प्रामुख्याने घेण्यात आला. त्यात तंटामुक्ती समिती अध्यक्ष निवडीसाठी, गावातील नागरिकांनी ग्रामसभेसाठी चांगलीच गर्दी केली होती. तंटामुक्त समिती अध्यक्ष पदासाठी ६ उमेदवारांनी अर्ज केला. परंतु गावातील जनतेचा कौल परत रामेश्वर राऊत यांच्या बाजूंनी लागला. आणि त्यांची बहुमताने तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. रामेश्वर राऊत यांनी मागील कारकिर्दीत चांगल्या प्रकारे काम केले, त्यामुळे नागरिकांनी परत एकदा त्यांना संधी दिली.यावेळी ग्रामपंचायत कार्यालया मध्ये ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन पेडा चारून स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सरपंच डॉ श्रीराम मुखमाले, विठ्ठलराव राऊत, दादाराव राऊत, नंदकिशोर गावंडे, गंगादिप राऊत, प्रकाश इंगोले, राजु भगत, संजय इंगोले, विशाल इंगोले, संतोष हेकड, ज्ञानेश्वर कुरवाडे, मोहन पानभरे, यशवंतराव राऊत, रामेश्वर सोलव, राजु राऊत, अनिल इंगोले, बाळू ठाकरे, गोपाल झोबाळे, डि. के. भगत, आदींनी पुष्पगुच्छ देऊन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...