आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय:कळसा पोटनिवडणुकीत रवी वाघ विजयी

दिग्रस21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्रस तालुक्यातील कळसा ग्रामपंचायत येथील प्रभाग क्रमांक दोनची पोटनिवडणूक रविवार दि. ५ जून रोजी झाली. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी, ६ जून रोजी पार पडली. या पोटनिवडणुकीत रवी वाघ विजयी झाले.

कळसा ग्रामपंचायतच्या प्रभाग क्र. २ ची पोटनिवडणुकीसाठी एकूण चार उमेदवार रिंगणात उभे होते. या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानावेळी एकुन ७८० मतदारा पैकी ५६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सोमवार दि. ६ जुन रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात मतमोजणी पार पडली. या मतमोजणीत अनिल महल्ले यांना २१३ मते, गोपाल पाटील यांना ७३ मते, नीलेश डफडे यांना २९ मते तर सर्वाधिक २४१ मते रवी पुंडलिक वाघ यांना मिळाले. त्यामुळे रवि वाघ यांचा २८ मतांनी विजय झाला.

रवी वाघ यांच्या विजया करीता आमदार संजय राठोड यांच्या मार्गदर्शनात शिवसैनिक राहुल शिंदे यांनी विशेष रणनिती आखली होती. रवी वाघ विजयी झाल्याचे कळताच समर्थकांनी जल्लोष केला. तर दिग्रस शिवसेनेच्या वतीने वाघ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख, शिवसैनिक राहुल शिंदे, सरपंच हरीश मनवर, रितेश चव्हाण व शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...