आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 नोव्हेंबरला आयोजन:आयटीआय अनुत्तीर्णांना पुन्हा परीक्षेची संधी ; परीक्षा शुल्क भरण्याची आज शेवटची तारिख

यवतमाळ5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयटीआयला प्रवेश घेतल्यानंतर नापास झाल्यामुळे प्रमाणपत्र मिळू न शकलेल्या २०१४ ते २०२१ या कालावधीतील प्रशिक्षणार्थींना आता केंद्र शासनाने पुन्हा उत्तीर्ण होत प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याची एक संधी उपलब्ध करून दिली आहे. या विद्यार्थ्यांसाठी खास २५ नोव्हेंबरपासून परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून त्यांचे अर्जही संबंधित आयटीआयने भरून घेतले आहे. दरम्यान, परीक्षा शुल्क भरण्याची मुदत १० नोव्हेंबर देण्यात आली. या प्रशिक्षणार्थींना प्रवेश शुल्क भरावे लागणार असून त्याशिवाय परीक्षाही देता येणार नसल्याचे आयटीआयच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

नवी दिल्ली येथील प्रशिक्षण महासंचालनालयामार्फत अखिल भारतीय व्यवसाय सत्र व वार्षिक पुरवणी परीक्षेचे २५ नोव्हेंबरला आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑक्टोबर महिन्यातच फेर परीक्षेचे अर्जही भरले आहेत. परंतु अनेकांनी त्यापैकी परीक्षा शुल्क भरले नाहीत. अशा प्रशिक्षणार्थींसाठी आयटीआयमध्ये संपर्काची १० नोव्हेंबर ही अखेरची मुदत दिली असून त्यासाठी आता एकच दिवस उरल्याने त्वरित संपर्क करत या प्रशिक्षणार्थीनी अर्ज अन् परीक्षा शुल्क त्वरित भरावे. परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जे विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात, त्यांना अॅप्रेंटिसशिप करता येत नाही. तसेच जर कुणी नोकरी करीत असेल तर त्यांना कायम होण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे या पुरवणी परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना पुन्हा संधी मिळणार आहे.

अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू प्रशिक्षणार्थिंसाठी आयटीआयमध्ये १० नोव्हेंबर ही संपर्काची अखेरची मुदत दिली असून त्यासाठी आता एकच दिवस उरल्याने त्वरित संपर्क करत या प्रशिक्षणार्थीनी अर्ज अन् परीक्षा शुल्क त्वरित भरावे. परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे

ऑनलाइन पद्धतीने परीक्षा वार्षिक पुरवणी ही ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. २०१७ ते २०२२ पर्यंत परीक्षा पद्धतीने बदल झालेत. सुरवातीला लेखी नंतर ओएम शिट आणि नंतर ऑनलाइन असे बदल होत गेले. यात काही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते. त्यांना ही परीक्षा संधी आहे.

बातम्या आणखी आहेत...