आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील उपजिल्हा रुग्णालयाचे इमारतीचे बांधकाम नियोजित जागेवरील कर्मचारी निवासस्थानाची इमारत पाडण्याच्या ना हरकत प्रमाणपत्रामुळे अडकले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारत पाडण्याच्या ना हरकत प्रमाणपत्राने अकोला येथील आरोग्य विभागाच्या उपसंचालकांनी यांनी मोडकळीस आलेली कर्मचारी निवासस्थानाची इमारत पाडण्याचा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या जागेचा प्रश्न आमदार बळवंत वानखडे यांच्या प्रयत्नाने सुटला आहे. ‘दिव्य मराठी’ने याबाबत १० एप्रिलच्या अंकात वृत्त प्रसिद्ध केले होते.
अंजनगाव सुर्जी येथे ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रीवर्धन करून ५० खाटा क्षमतेचे एकूण २३ कोटी रुपयांच्या इमारत बांधकाम प्रशासकीय मान्यता प्राप्त असून, बांधकाम करण्याच्या कंत्राट नागपूर येथील आदित्य कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावाने कार्यारंभ आदेश झालेला आहे. येथील ग्रामीण रुग्णालयाचर कर्मचारी निवासस्थान इमारत ही सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेली अाहे याच जागेवर नवीन उपजिल्हा रुग्णालयाची इमारत बांधायची असल्याने कर्मचारी निवासस्थानाची इमारत पाडण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमाणपत्र आवश्यक होते.
हे नहारकत प्रमाणपत्र सोमवारी (दि. १०) अकोला आरोग्य सेवा मंडळाच्या उपसंचालकाला प्राप्त झाले आहे. या ना हरकत प्रमाणपत्रामुळे कर्मचारी निवासस्थानाची इमारत पाडण्याच्या प्रस्तावाला आरोग्य सेवा मंडळाचे उपसंचालक डॉ. तरंगतुषार वारे यांनी मंगळवारी (दि. ११) मंजुरी दिली. त्यामुळे अंजनगाव सुर्जी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचा बांधकामालचा प्रश्न निकाली लागला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.