आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी संवर्धन आवश्यक:पाण्याची किंमत ओळखून त्याचे संवर्धन आवश्यक

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगात ७० टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे, हे सर्वश्रुत आहे. परंतु यापैकी केवळ ०.२ टक्के पाणीसाठा पिण्यास योग्य असून नदी, धरणे, तलाव आदींमध्ये उपलब्ध आहे. या पाणी साठ्यात दोन हजार वर्षांत कोणताही बदल झाला नाही, परंतु लोकसंख्या वाढीमुळे दरडोई पाण्याची उपलब्धता मात्र कमी झाली आहे. त्यामुळे आजच पाण्याची किंमत ओळखून त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने संवर्धन करा”, असे प्रतिपादन वरिष्ठ संशोधक प्रा. डॉ. प्रमोद यादगिरवार यांनी केले. नुकतेच बुधवार, दि. ३० मार्च रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व अमोलकचंद विधी महाविद्यालयाचे संयुक्त विद्यमाने पाणी संवर्धन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश एम. आर. ए. शेख उपस्थित होते. कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. प्रमोद यादगिरवार, सहयोगी संचालक, क्षेत्रीय कृषी संशोधन केंद्र, विदर्भ विभाग व प्रा. डॉ. सुप्रभा यादगिरवार, प्राचार्य, अमोलकचंद विधी महाविद्यालय यांचेसह प्रा. डॉ. विजेश मुनोत व प्रा. डॉ. संदीप नगराळे व्यासपीठावर विराजमान होते.

सर्वप्रथम प्रा. छाया पोटे यांनी प्रास्ताविक तसेच पाहुण्यांचा परीचय करून दिला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी कार्यशाळेला समयोचित मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे आभार प्रदर्शन पॅरा विधी स्वयंसेवक निखिल सायरे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...