आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दशा:मजीप्रातील अधिकारी, ठेकेदारांवर गुन्हे नोंदवा ; पाईपलाईनमुळे रस्त्यांची दुर्दशा

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमृत योजने अंतर्गत टाकण्यात आलेल्या पाइपलाइनमुळे शहरातील रस्त्यांची जी दुर्दशा झाली आहे. त्यावर उपाययोजना करण्यात यावी, संबंधित कार्यालयीन जबाबदार जीवन प्राधिकरणातील अधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करण्यातयावी, अशी मागणी यवतमाळ शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली. यवतमाळ शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यवतमाळकरांपुढे बेंबळाच्या पाण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही हे सर्वश्रुत असताना सुद्धा प्रशासन पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तोकडा प्रयत्न करताना दिसत आहे. अमृत योजनेचे काम २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे प्रस्तावित होते. परंतु सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता या कामाला गती देण्याची गरज आहे. अमृत योजना ही मोठी असून अनेक तांत्रिक बाबींचा समावेश आहे. ही योजना परिपूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारा कालावधी कधीचाच संपला आहे. मात्र तरीही यवतमाळातील टंचाईची दाहकता बघता कमीत कमी अवधीत बेंबळाचे पाणी यवतमाळात आणण्याचा प्रयत्न केला जात नाही आहे. १९७५ मध्ये निळोणा धरण साकारले होते. त्यानंतरही येथील पाणी समस्या कायमच होती. युती शासनाच्या काळात चापडोह धरण तयार करण्यात आले. तेव्हाच शहरातील ग्रामीण भागात सर्वदूर चापडोहचे पाणी पोहोचले. आता पुन्हा तशीच स्थिती निर्माण झाली आहे. अमृतची योजना एका टप्प्यात पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. २३ एप्रिल २०१७ मध्ये हे कंत्राट देण्यात आले. २८ किलोमीटर पाईपलाईन, २० लाख लिटरचा सम्प, फिल्टर प्लांट, पंपिंग हाऊस, ३३ केव्हीचे सब स्टेशन, पर्यायी व्यवस्था म्हणून चार मेगा वॅटचा सोलर प्लांट असा परिपूर्ण प्रकल्प केला जात आहे. २०१९ पर्यंत या प्रकल्पाचे काम करणे अपेक्षित असताना केवळ टंचाईसाठी तातडीची उपाययोजना म्हणून २८ किलोमीटरची पाइपलाइन टाकली जात आहे, आज जनतेला अमृत योजनेमुळे फक्त पाण्याचीच नाही तर पाइपलाइनमुळे रस्ते खोदून जी सर्वत्र रस्त्यांची दुर्दशा केली आहे. त्यामुळे सुद्धा नागरिक परेशानी होत आहे. संपुर्ण रस्त्यांची चाळणी झाली असून सर्वत्र धूळ होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील ठिकाणी केलेला खड्ड्यांमुळे नागरिकांना जो नाहक त्रास सहन करित आहे. याला जीवन प्राधिकरणाचे अधिकारी व ठेकेदार जबाबदार असून यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत असे निवेदन शहर काँग्रेस कमटीच्यावतीने मुख्याधिकारी माधुरी मडावी यांना देण्यात आले. यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष चंदू चौधरी , उषा दिवटे, पल्लवी रामटेके, दर्शना इंगोले, अजय किन्हीकर, उमेश इंगळे, आशिष महल्ले, प्रियंका बिडकर, दत्ता हाडके, लाला टेलगोटे, संगीता उमरे ,डॉ. संदीप टेळगोटे, सागर माहूरकर, राजू गवळी, अजय मैत्रेवार, व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...