आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुसद तालुक्यात कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा‎:केंद्र संचालकासह आठ‎ पर्यवेक्षकांवर गुन्हे नोंदवा‎

पुसद‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील काटखेडा येथील‎ उच्च माध्यमिक विद्यालयाच्या‎ परीक्षा केंद्रावर नियुक्त असलेल्या‎ केंद्र संचालकासह आठ‎ पर्यवेक्षकावर गुन्हे दाखल करण्याचे ‎ ‎ आदेश अमरावती विभागीय‎ मंडळाचे विभागीय सचिव उल्हास ‎ ‎ नरड यांनी दिले. तालुक्यात ‎ ‎ कॉपीमुक्ती अभियानाचा फज्जा ‎ ‎ उडालेला असून अनेक परीक्षा ‎ ‎ केंद्रावर गैरप्रकार सुरू आहे. मात्र ‎त्याकडे प्रशासनाकडून डोळेझाक‎ होत आहे.‎ काटखेडा येथील परीक्षा केंद्र‎ क्रमांक ६७२ वर दि. २७ फेब्रुवारी‎ रोजी बारावीचा भौतिकशास्त्राचा‎ पेपर होता. यावेळी दुपारी १२‎ वाजताच्या दरम्यान पुसदचे‎ उपविभागीय अधिकारी तथा‎ सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेएन‎ एस. यांनी भेट दिली असता केंद्रावर‎ मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू‎ असल्याचे त्यांच्या निदर्शनास‎ आले. त्यानंतर उपविभागीय‎ अधिकाऱ्याने त्याच दिवशी‎ गटशिक्षणाधिकारी यांना ग्रामीण‎ पोलीस स्टेशनमध्ये नऊ‎ जणांविरोधात गुन्हे दाखल‎ करण्याचे निर्देश देण्यात आले होते.‎

परंतु गटशिक्षणाधिकाऱ्याला ग्रामीण‎ ‎ ‎पोलीस स्टेशन मधून बोलून घेतले‎ व जिल्हाधिकारी यांच्या दालनात‎ तक्रार दाखल करणार असल्याचे‎ सांगितले होते. त्या कारवाईची‎ दखल घेत अमरावती विभागीय‎ मंडळाचे विभागीय सचिव उल्हास‎ नगर यांनी गटशिक्षणाधिकारी यांना‎ नुकतेच एक आदेश पाठवले आहे.‎ त्यात केंद्र संचालकासह तीन‎ खोलीतील आठ शिक्षकाविरोधात‎ फौजदारी स्वरूपाची कारवाई‎ करण्याचे आदेश दिले आहे.‎ केंद्रावरील नऊ जणांविरोधात‎ तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल‎ करण्याचे आदेश आता पुसद येथे‎ धडकले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...