आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योजनांचा लाभ:ई-श्रम पोर्टलद्वारे 5 लाख कामगारांची नोंदणी

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी राबवलेल्या ‘ई-श्रम’ विशेष मोहिमेत जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ५ लाख ११ हजार ४४७ कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात ९ ते १२ लाख असंघटित कामगार असावेत, असा अंदाज कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आत्तापर्यंत सुमारे ३० टक्के असंघटित कामगारांची नोंदणी झाली आहे.

असंघटित क्षेत्रातील कामगारांना केंद्र व राज्य सरकारच्या सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांची नोंदणी करण्याचे मोहीम नगर जिल्ह्यात सहायक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत २६ ऑगस्ट २०२१ पासून सुरू करण्यात आली आहे. देशभर ही मोहीम राबवली जात आहे. त्यासाठी ‘ई-श्रम’ पोर्टल तयार करण्यात आले आहे.

या नोंदणीमुळे सरकारला स्थलांतरित कामगारांची माहिती ठेवणे शक्य होणार असल्याचे सहायक कामगार आयुक्त नितीन कवले यांनी सांगितले. असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी सहायक कामगार आयुक्त कवले यांनी पुढाकार घेत शिबिरे सुरू केली आहेत. संघटना, स्वयंसेवी संस्थांच्या बैठका घेऊन जनजागृती केली जात आहे. शिबिरातून कामगारांची पोर्टलवर नोंदणी केली जात आहे. कामगार स्वतःहून पोर्टलवर नोंदणी करू शकतो किंवा नागरी सुविधा केंद्रात (सीएससी) जाऊन नोंदणी करू शकतात. असंघटित क्षेत्रात सुमारे ३०० उद्योगांचा समावेश आहे. त्यामधील या क्षेत्रात काम करणारे १६ ते ५९ वयोदरम्यानचा कामगार नोंदणी करू शकतो. ‘ई-श्रम’ नोंदणीनंतर पीएम-एसबीवाय विमा योजनेतून संबंधित कामगाराला अपघाती मृत्यू, अपंगत्व आल्यास २ लाख तर अपघातात अपंगत्व आल्यास एक लाखाचा विमा लाभ एक वर्षासाठी लागू होणार आहे.

ई श्रम कार्ड काढून घ्यावे
असंघटीत कामगारांवरती कुठलीही आपत्ती आली किंवा काही नुकसान झाले असता त्यांच्यासाठी शासन काही करू शकत नाही. म्हणून शासन या नोंदणीच्या माध्यमातून अशा लोकांना एक युएएन एक विशिष्ट नंबर देणार आहे. आणि त्याचे ई-श्रम कार्ड आधार कार्ड सारखे देणार आहे. त्यामुळे त्या लोकांना एक ओळख मिळणार असून शासनाच्या अनेक लाभ मिळण्यास सोपे होणार आहे. त्यामुळे सर्वांनी ही नोंदणी करणे गरजेचे आहे असे आवाहन जिल्हा कामगार अधिकारी महाले यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...