आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतीक्षा:कोरोनाग्रस्तांच्या नातेवाइकांना सानुग्रह अनुदानाची प्रतीक्षा कायम

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसाला ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची योजना शासनाने डिसेंबर २०२१ पासून राबवण्यास सुरुवात केली. मात्र, जिल्ह्यात तीनशे लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत. त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातूनही शासनाकडे मागणीची प्रक्रिया करण्यात आली. परंतु, राज्य स्तरावरून प्रतिसाद नसल्याने योजना बारगळल्याप्रमाणे वाटत आहे.

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेकांचा मृत्यू झाला. काहींचे अख्खे कुटुंब उद्ध्वस्त झाले तर काही कुटुंबातील मुख्य कर्ता पुरूष गेला. अशा कुटुंबांना आधार देण्यासाठी राज्य शासनाने मृतांच्या वारसाला ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची योजना सुरू केली होती. यासंदर्भात गतवर्षी डिसेंबरमध्ये अधिकृत शासननिर्णयही जारी झाला. तेव्हापासून संबंधितांनी ऑनलाईन पद्धतीने यासाठी जिल्ह्यात दोन हजार पाचशे वर प्रस्ताव सादर केले. त्यानुसार काही वारसांना अनुदान राज्यस्तरावरूनच भूकंप व पुनर्वसन विभागाकडून देण्यात आले होते. मात्र, काही दिवसच अनुदान देण्याची प्रक्रिया सुलभतेने करण्यात आली. परंतु, गेल्या सहा महिन्यांपासून अनुदान देण्याची प्रक्रिया मंद झाली आहे. ज्यांनी अनुदानासाठी अर्ज सादर केले होते, त्यांना अद्यापही अनुदान मिळालेले नाही. असे अनेक लाभार्थी सातत्याने जिल्हाधिकारी कार्यालयात फेऱ्या मारत आहेत.

जिल्ह्यातून सातत्याने राज्य शासनाकडे माहिती सादर
जिल्हाधिकारी कार्यालयातून सातत्याने यासंदर्भातील माहिती राज्य शासनाकडे पाठवण्यात आली आहे. सध्याही तब्बल तीनशे प्रस्तावांच्या संचिका जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्रुटी दूर करून पाठवल्या आहेत. मात्र, असे सातत्याने करूनही राज्य स्तरावरून प्रतिसाद मिळत नाही. आता तर अनेक लाभार्थींनीही आशा सोडलीआहे. यामुळे त्यांच्याकडून विचारणा होणेही बंद झाले आहे.

जिल्ह्यात अडीच हजारावर कोरोनामुळे मृत्यू
जिल्ह्यातील अडीच हजार नागरिकांचा जिल्ह्यात व जिल्ह्याच्या बाहेर मृत्यू झाला आहे. यामध्ये १८०४ जणांचा जिल्ह्यातील विविध रुग्णालयात मृत्यू झाला. जिल्ह्याच्या बाहेर, हृदयरोग, दमा, कर्करोग आदी दुर्धर आजाराने बाकीच्या कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...