आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:धार्मिक संस्थांनी सामाजिक कार्यात पुढे यावे ; अन्न व औषधी प्रशासन मंत्री राठोड

यवतमाळ23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध धार्मिक संस्थांनी अध्यात्मिक व धार्मिक बाबींसोबतच सामाजिक कार्यातही पुढाकार घ्यावा, असे आवाहन अन्न व औषधी प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी केले. ते रविवारी दारव्हा तालुक्यातील देऊळगाव वळसा येथील महालक्ष्मी मंदिरात महाआरती प्रसंगी सत्कार समारंभात बोलत होते.अध्यक्षस्थानी डॉ. संजय राऊत होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार, श्रीधर मोहोड, नामदेवराव जाधव, प्रकाश राऊत, सिंधु राठोड, उषा चव्हाण, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, पोलिस निरीक्षक म्हस्के आदी उपस्थित होते.

संजय राठोड म्हणाले, धार्मिक संस्थाचे सामाजिक योगदान काळाची गरज आहे. सामाजिक उपक्रमांसाठी शेगावसारख्या संस्थांचा आदर्श सर्व संस्थांनी घ्यायला हवा. देऊळगाव वळसा येथील महालक्ष्मी मंदिर एकमेवाद्वितीय आहे. या मंदिराचे प्राचीन महात्म्य जपणे आपली सर्वांची जबाबदारी आहे. येथे वन विभागाच्या वतीने निसर्ग पर्यटनाची सोय करून देण्यात आली. सोबतच अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भविष्यातही मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही ना. संजय राठोड यांनी यावेळी दिली. कार्यक्रमास देऊळगाव वळसा येथील सरपंच, ग्रा. पं. सदस्य, पोलिस पाटील आदींसह गावकरी, कार्यकर्ते, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...