आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन:राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून हटवा ; वादग्रस्त विधान प्रकरणी काँग्रेस आक्रमक

यवतमाळ10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात शहर काँग्रेस आक्रमक झाली आहे. बुधवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हा कचेरीवर धडक देवून छत्रपती महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांना पदावरून बडतर्फ करण्यात यावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिले. महाराष्ट्र राज्याला सुसंस्कृत व पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेला आहे. अशा या राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी हे वारंवार वाचाळ वक्तव्य करीत आहे.

गत शनिवारी बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित एका कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केले. शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी े जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी प्रफुल्ल मानकर, चंद्रशेखर चौधरी, उषा दिवटे, बबलु देशमुख, अरूण ठाकुर, संगीता पारधी, संगीता उमरे, रूपाली मासाळ, मनोज पाचघरे, अनिल चवरे, विशाल पावडे, डॉ. संदिप तेलगोटे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...