आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहागाव तालुक्यातील वडद (ब्रम्ही) येथील बंद असलेले जलशुद्धीकरण संयंत्र ताबडतोब दुरूस्त करून पाणी पुरवठा पूर्ववत करावा, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले. गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची पाहणी करून नमुने तपासणी करीता पाठविले होते. यात फ्लोराइडचे प्रमाण सामान्य होते. तर टीडीएसचे अल्प प्रमाण वाढले होते.
वडद (ब्रम्ही) गावातील ४० हून अधिक जणांचा किडनीच्या आजाराने मृत्यू झाला होता. ही बाब सर्वप्रथम दैनिक दिव्य मराठीने ७ जून रोजी वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पाणी पुरवठा योजनेचा आढावा घेतला. सन २०१५-१६ मध्ये दोन जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात आल्याची बाब समोर आली, परंतू दोन्ही संत्रत्र सध्या बंद आहे. ग्रामपंचायतीने संयत्रे दुरुस्तीकरिता संबंधित पुरवठादारासह आगावू रक्कम देवूनही रखडलेले होते. ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार तात्काळ पाणी पुरवठा विभागास संयत्रांची पाहणी करून १२ जून रोजी पर्यंत दुरुस्ती करावी आणि पाणी पुरवठा सुरू करावा, असे निर्देश दिले. विशेष म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी गावाला प्रत्यक्ष भेट द देवून अहवाल सादर केला होता. पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणी करीता पाठविण्यात आले होते. यात टीडीएसचे अल्प प्रमाण वाढल्याचे समोर आले.
गावातील पाच रुग्ण किडनीग्रस्त
सन २०१४ ते २०२२ ह्या कालावधीत एकूण १२ रुग्णांचा वैद्यकीय दृष्ट्या वेळीच योग्य उपचाराअभावी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या गावामध्ये ४८ ते ६० दरम्यानचे पाच रुग्ण किडणी आजारग्रस्त आहेत. या रुग्णांची नियमित तपासणी करून योग्य उपचारासंबंधाने समुपदेशन करण्याचे निर्देश आरोग्य विभागास दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.