आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:स्वत: खर्च करून रस्त्याची केली दुरूस्ती; खडी, मुरूम टाकून केली डागडुजी, वरून फिरवला रोडरोलर

ढाणकीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ढाणकी नगरपंचायतच्या अंतर्गत प्रभाग क्रमांक १६ मधील नव्या बसस्थानकापासून ‘नाथांजली इंण्डेण गॅस’ कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची पावसाळ्यात अक्षरशा चाळणी झाली होती. वाहन चालवणे तर सोडा नागरिकांना पायी चालताना देखील मोठी कसरत करावी लागत होती. नागरिकांची ये-जा करताना होत असलेली तारांबळ बघून प्रभागात वास्तव्यास असलेल्या योगेश पाटील यांनी स्वतःच्या खर्चातून चाळणी झालेल्या रस्त्यावर खडक व मुरूम टाकून त्याची डागडुजी तर केलीच, याशिवाय त्यावरून रोड रोलर फिरवून सिमेंट रस्त्या सारखा मजबूत बनवला.

अतिवृष्टीच्या पावसाने प्रभाग क्रमांक १६ मधील रस्ता अक्षरशा चिखलमय झाला. त्यातच पाइपलाइन गाडण्याचे काम नगरपंचायत कडून करण्यात आले. त्यामुळे त्या कामाची माती रस्त्यावर पडली. रस्ता होत्याचा नव्हता झाला होता. पावसाळ्यामध्ये तात्पुरता मुरूम टाकून ‘इंण्डेन गॅस’चे मालक यांनी रस्त्याची डागडुजी केली. आता पावसाची उघडीप झाल्यामुळे त्यांनी स्वतः जवळपास ५० हजार रूपये खर्च करून तो रस्ता मजबूत बनवला. त्यामुळे आता त्या रस्त्यावरून चालताना नागरिकांना मौज वाटत आहे. सार्वजनिक रस्त्याची स्वखर्चाने डागडुजी करणे ही पहिल्यांदाच पहावयास व ऐकावयास मिळत आहे. योगेश पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. नगरसेवकांनी या प्रभागातील इतर रस्त्याची अशीच मजबुतीकरण व रुंदीकरण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र नगरपंचायत कोणते पाउल उचलेल याकडे नागरिकांचे लक्ष आहे.

बातम्या आणखी आहेत...