आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा:जुगाराची तक्रार एसपींकडे करा किंवा ठाणेदाराला भेटा

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब शहरात सुरू असलेल्या मटका, जुगारासारख्या अवैध धंद्यांना स्थानिक पोलिस अभय देत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ शुक्रवार, दि. ४ नोव्हेंबरला समोर आल्याने एकच खळबळ उडाली. जुगाराची तक्रार एसपीकडे करा, नाहीतर ठाणेदाराला भेटा अशा उद्धट शब्दात पोलिस कर्मचारी अजय शेंडे याने तक्रारदार दिनेश वानखेडे यांना खडसावले. गावात खुलेआम अवैध धंदे सुरु असल्याबाबत तक्रारदाराने स्थानिक पोलिसांकडे तक्रारी केल्या. मात्र कारवाया होत नसल्याने थेट वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना अवैध धंद्यांचा व्हिडिओ पाठविला. त्यामुळे संतापलेल्या वादग्रस्त पोलिस कर्मचारी अजय शेंडे ह्याने तक्रारकर्त्यालाच दम भरला.

यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू, मटका, जुगारासारखे अवैध धंदे सुरू आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पदभार स्वीकारताच सर्व ठाणेदारांना आपल्या परिसरातील अवैध धंदे तत्काळ बंद करा, अशा सूचना सुद्धा दिल्या आहे. या पार्श्‍वभूमीवर कळंब येथे सुरू असलेल्या मटका, जुगारासारख्या अवैध धंद्यांना स्थानिक पोलिसांकडूनच अभय देण्यात येत असल्याचा हा धक्कादायक व्हीडीओ समोर आला आहे. ‘तू हा व्हीडीओ एसपीला पाठविला तरी मला काही फरक पडत नाही’, असे सांगून अजय शेंडे तक्रारदारालाच खडसावताना दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...