आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन‎:रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत खांब‎ हटवण्याची मागणी, अधिकाऱ्यांना निवेदन‎

रिसोड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील गणेशपूर येथे रस्त्याच्या मधोमध‎ असलेले विद्युत खांब रहदारीसाठी अडथळा ठरत आहे.‎ ते हटवण्याची वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष होत‎ असल्याने अखेर गणेशपूर ग्रा. पं.च्या पदाधिकाऱ्यांनी‎ गुरुवार, २ फेब्रुवारी रोजी महावितरणचे कार्यालय गाठून‎ अधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनानुसार रस्त्याच्या‎ मधोमध विद्युत खांब आल्याने वाहतुकीची कोंडी होत‎ असून, एखादी मोठी जीवितहानी होण्याची शक्यता‎ नाकारता येत नाही.

तसेच अनेक विद्युत खांब जीर्ण झाले‎ असून ते बदलण्याचीही मागणी निवेदनात करण्यात‎ आली आहे. निवेदन देताना सरपंच शोभा विजय जाधव,‎ विष्णू जाधव, ग्रा. पं. सदस्य विजय मुटकुळे, नामदेव‎ कामखेडे, रामजी खंडागळे, मोरे आदी उपस्थित होते.‎ तर ही समस्या लवकरात लवकर मार्गी लावणार‎ असल्याचे आश्वासन यावेळी रिसोड येथील‎ महावितरणचे अभियंता हरीश गिर्हे यांनी दिले.‎

बातम्या आणखी आहेत...