आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगीची घटना:माणिकवाडा येथील उपाहारगृह आगीत खाक ; दोन लाखाच्या आसपास नुकसान

नेर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेर तालुक्यातील माणिकवाडा येथे शुक्रवारी अचानक उपाहार गृहाला लागलेल्या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले. ही घटना शनिवारी मध्यरात्री दरम्यान घडली असून या आगीत जवळपास उपाहारगृह मालकाचे दोन लाखाचे नुकसान झाले आहे.

नेर तालुक्यातील माणिकवाडा येथील बसस्थानक चौकात विजय भुते यांचे उपाहार गृह आहे. शनिवारी सायंकाळी दररोज प्रमाणे दुकान बंद करून ते घरी गेले. दरम्यान मध्यरात्रीच्या उपाहार गृहाला अचानक आग लागली. मध्यरात्रीला दुकानाला आग लागल्याने आगीने रुद्रावतार धारण केल्याने दुकानातील साहित्य या आगीत जळून खाक झाले. यात उपाहार गृहातील दोन फ्रिज, लाकडी टेबल, कपाट, रॅक, टेबल, खुर्च्या, कोड्रिंक्स स्ट्रे, प्लास्टिक टाक्या व इतर साहित्य आगीत जळून खाक झाले. यावेळी रात्रीला गावात आलेल्या इसमास दुकानातुन धुर निघत असल्याचे दिसल्यावर आरडाओरड केली. त्यानंतर गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतू आगीने उग्र रूप धारण केल्याने संपूर्ण उपाहार गृहातील साहित्य या आगीत जळून खाक झाले होते. यात उपाहार गृह मालकाचे दोन लाखाचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे नेमकी आग कशी लागली हे कळू शकले नाही. प्रशासनाने पंचनामा करून शासकीय मदत द्यावी, अशी मागणी उपाहार गृह मालक विजय भुते यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...