आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महागाव:सेवानिवृत्त नायब तहसीलदार मामाचा भाच्यानेच केला खून; तीन तासांतच भाच्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

महागाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवारी रात्रीच्या सुमारास खून केला. ही घटना पिंपळगाव - महागाव मार्गावरील उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली होती. अखेर या प्रकरणातील मारेकरी भाच्याला यवतमाळातील लोहारा पोलिसांनी गुरुवारी रात्रीच्याच सुमारास ताब्यात घेतले. मोहन पेंदोरकर असे मृत सेवानिवृत्त नायब तहसीलदार यांचे नाव आहे. तर पवन श्रीराम मंगाम रा. विश्वशांती नगर, यवतमाळ असे मारेकरी भाच्याचे नाव असून त्याला न्यायालयाने चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. महागाव तहसील कार्यालयाचे नुकतेच सेवानिवृत्त संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार मोहन पेंदोरकर यांचा मृतदेह गुरुवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास फुलसावंगी मार्गावर असलेल्या पिंपळगाव ते महागाव रस्त्या दरम्यान रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला होता. मात्र हा अपघात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून वर्तवण्यात आली होती. परंतू पेंदोरकर यांच्या मृतदेहाजवळ कोणतेही वाहन आढळून आलेले नव्हते. त्यामुळे शंकेला पेव फुटले आणि खून असल्याचा संशय व्यक्त केला गेला.

यावेळी पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह सवना येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. त्यावेळी वैद्यकीय तपासणीत मृताच्या पोटात धारदार शस्त्राने सपासप वार केल्याचे आढळून आल्याने डॉक्टरांनी हा खून असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला. ही बाब लक्षात येताच पोलिसही चक्रावून गेले. दरम्यान पोलिसांना पवन मंगाम याच्यावर संशय असल्याने त्यांनी शोधमोहीम सुरू केली. अशात तो यवतमाळकडे रवाना झाल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच यवतमाळातील लोहारा पोलिसांनी सापळा रचून तिन तासातच त्याला ताब्यात घेवून महागाव पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी चंदाबाई पेंदोरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून खुनात वापरण्यात आलेले वाहन जप्त केले आहे. शुक्रवारी महागाव पोलिसांनी मारेकरी पवन मंगाम याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास एसडीपीओ वालचंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार विलास चव्हाण करीत आहे.

स्वत:च्या वडिलांच्या खुनात पवनचा होता समावेश
सेवानिवृत्त नायब तहसीलदार मोहन पेंदोरकर यांचा खून करणारा पवन श्रीराम गंगाम याने २०१४ साली वडील “श्रीराम” यांचा खून केल्याची माहिती आहे. वडिलांच्या खून प्रकरणात मुलगा पवन यांने तुरुंगवास सुद्धा भोगला आहे. पवन यांच्या हातून हा दुसरा खून असल्याने महागाव शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांसमोर कबुली
मारेकरी भाचा पवन हा खासगी चालक असून दोन दिवसापूर्वी मामा मोहन पेंदोरकर यांच्या भेटीसाठी तो महागाव येथे आला होता. मामाने चारचाकी वाहन घेतल्याने भाचा पवन मामाला गाडी शिकवण्यासाठी फुलसावंगी रोडवर घेवून गेला. संधीचा फायदा घेऊन पवनने मामाच्या पोटात कैचीने वार करुन कारने यवतमाळकडेे पळून गेलो, अशी कबुली पवनने दिली.

बातम्या आणखी आहेत...