आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट:वेतनात अतिरिक्त जमा झालेले पैसे परत करा; जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश

यवतमाळ5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद बांधकाम विभागातील बारा कर्मचाऱ्यांना अतिरिक्त जमा झालेले वेतन परत करावे, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले. त्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांनी तयारी दर्शवली असून, बहुतांश कर्मचाऱ्यांनी धनादेशसुद्धा दिल्याची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात दैनिक दिव्य मराठीमध्ये वृत्त प्रकाशित केले होते.

कार्यालयीन वेळेत दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करावे, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते. या आदेशानुसार ऑक्टोंबर महिन्यात होणाऱ्या दिवाळीच्या वेतनात ही कपात करण्यात येणार होती. त्या कर्मचाऱ्यांचे वेतन कपातसुद्धा केले. मात्र, वेतन कपात करताना बारा कर्मचाऱ्यांच्या खात्यात अतिरिक्त जवळपास सव्वाचार लाखांहून अधिक रूपये वळते केले होते. दैनिक दिव्य मराठीत याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी अतिरिक्त वेतन त्वरीत परत करावे, असे आदेश कर्मचाऱ्यांना दिले होते. कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त वेतन परत करण्यास संमत्ती दर्शवली होती. धनादेशसुद्धा दिले, परंतु काही कर्मचाऱ्यांनी पैसे खर्च केल्याची माहिती आता समोर आली आहे.

वेतन तपासणीकडे दुर्लक्ष
कामांचे देयके काढण्यासाठी बांधकाम विभागात कंत्राटदाराचा नियमित मुक्काम असतो. वित्त विभागातून कंत्राटदारांचे देयके माघारी येवू नये, ह्याकरीता त्यांच्या देयकांची तपासणी व्यवस्थित केली जाते. मात्र, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत गांभीर्य दाखविले जात नाही. काही कर्मचाऱ्यांचे अंशदान पेन्शन, जीपीएफ कपातीतसुद्धा तफावत असल्याचे आता समोर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...