आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअव्वल कारकून संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती मिळण्यासंदर्भात अमरावती विभागातील यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्हयातील महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात गुरुवार, १ डिसेंबर रोजी काळी फीत लावून आंदोलनाचा पहिला टप्पा यशस्वी करण्यात आला. यादरम्यान, यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलकांनी एकत्र येत मागण्यांसंदर्भात नारेबाजी केली.
या आंदोलनादरम्यान १ ते ३ डिसेंबर काळया फिती लावुन काम करणे, ५ डिसेंबर रोजी निदर्शने कार्यक्रम राबवीणे, ९ व १३ डिसेंबर रोजी आयुक्त कार्यालयापुढे धरणे आंदोलन करुन उपोषण करणे, दि. २३ डिसेंबर रोजी १ दिवसाचा संप करणे व दि. २६ डिसेंबर पासुन बेमुदत संप पुकारणे अशी आंदोलनाची रूपरेषा आखण्यात आली आहे. अमरावती विभागात नायब तहसीलदार संवर्गातील ७५ पेक्षा जास्त पदे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.