आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:महसूल कर्मचारी बेमुदत संपावर, कामकाज ठप्प; संपामुळे अनेकांच्या कामाची गोची

घाटंजी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक तहसील कार्यालय परिसरात महसूल कर्मचारी संघटना शाखा घाटंजीच्यावतीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. पहिल्याच दिवशी या संपाला १०० टक्के प्रतिसाद मिळाला असून कामकाज ठप्प पडल्याने शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडाल्याचा दावा संघटनेने केला आहे. तसेच संपामुळे अनेकांच्या कामाची गोची झाली आहे.

या संपामुळे संजय गांधी, श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थींची कामे होऊ शकले नाही. खनिकर्म विभागातील कामेही रखडली .कर्मचाऱ्यांचे आंदोलन टप्प्याटप्प्याने सुरू आहे. याअंतर्गत सोमवारपासून महसूल कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. त्यात बहुतांश कर्मचारी सहभागी झाले आहेत. आंदोलनस्थळी निवडणूक नायब तहसीलदार आर. डी. मेंढे यांनी भेट दिली. महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सचिन बागडे, उपाध्यक्ष यांची एस. जी. भगत, सचिव आर. बी. वानखेडे यांच्या नेतृत्वात सदर संप करण्यात आला. यात सहसचिव नीलेश पोटे, कोषाध्यक्ष संजय हुड, उपकोषाध्यक्ष राहुल हामंद, महिला प्रतिनिधी माया चेके, अजय भगत, नरेंद्र भगत, वाकोडे, योगिता वाघ, नीलिमा गोहणे, गणेश राखे, सफल पाटील, एस. कैलासवार, सतीश ईसासरे, मंजूषा निखाडे, शुभांगी धोटे, भारती धुर्वे, अनुप जयस्वाल, अखिल भोयर, मधु ईग्रवार, शंकर भगत, तुळशीराम मेश्राम, मोतेवार आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...