आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानायब तहसीलदारांचे ‘ग्रेड पे’ चार हजार तीनशे रुपयांवरून चार हजार आठशे रुपये करण्यात यावे, या मागणीसाठी तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेने सोमवार, ३ एप्रिलपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मात्र आंदोलनावर तोडगा निघाला नसल्याने महसूल यंत्रणा प्रभावित झाली आहे. नायब तहसीलदार हे राजपत्रित वर्ग दोन या श्रेणीत येते. नायब तहसीलदारांना कार्यकारी दंडाधिकारी म्हणून कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळावे लागते. याशिवाय अनेक समिती तसेच विभागासोबत त्यांना समन्वयक म्हणून काम करावे लागते. असे असतानाही नायब तहसीलदारांचा ‘ग्रेड पे’ कृषी, ग्रामविकास, सहकार विभागातील समक्ष पदापेक्षा कमी आहे. ‘ग्रेड पे’ वाढवण्याबाबत अनेक वर्षापासून संघटनेचा लढा सुरू आहे.
मात्र, शासनाने यावर तोडगा काढलेला नाही. त्यामुळे सोमवारपासून राज्यभरात कामबंद आंदोलन पुकारले आहे. मंगळवारपासून तहसिलदार, नायब तहसीलदार यांनी तहसील स्तरावर आंदोलन सुरू केले आहे. मात्र याचा सर्वाधिक फटका हा सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थी वर्गाला बसत आहे. नुकताच सरकारी कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सात दिवस संपत चालला होता. तर आता महसूल विभागाचे राजपत्रित अधिकारी असलेले तहसीलदार, नायब तहसीलदार हे बेमुदत काम बंद संपावर गेले आहेत. कर्मचारी अधिकारी यांच्यावर संपावर जाण्याची वेळ शासन का आणते? प्रलंबित मागण्यांवर शासन या आधीच तोडगा का काढत नाही? असा जरी प्रश्न असला तरी यात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी भरडले जात आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.