आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोजणी:शहरातील सहा रेतीसाठ्यांवर महसूल विभागाच्या पथकांची धडक ; रेतीसाठ्यांची तपासणी

यवतमाळ23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही महिन्यात शहरात विविध ठिकाणी करण्यात आलेल्या रेतीसाठ्यांची तक्रार महसुल विभागाकडे करण्यात आली आहे. त्या तक्रारीची दखल घेत महसुल विभागाच्या एका पथकाने शहरातील सहा वेगवेगळ्या ठिकाणी मोकळ्या जागांमध्ये करुन ठेवण्यात आलेल्या रेतीच्या साठ्यांवर धडक देत तपासणी केली. इतकेच नव्हे तर या रेतीसाठ्याची मोजणी करुन त्याचा अहवाल सादर करण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे हे रेतीचे अवैध साठे करुन ठेवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या रेतीसाठ्यासंदर्भात महसुल विभागाकडे एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यात या रेतीसाठ्यांची तपासणी करुन संबंधीत रेती साठे करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेत मंगळवार दि. ७ जुन रोजी महसुल विभागाच्या एका पथकाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत शहरातील विविध भागांमध्ये असलेल्या रेतीसाठ्यांच्या ठिकाणी अचानक धडक दिली. यावेळी संपुर्ण साठ्याची तपासणी करण्यात आली. त्यात गुलमोहर सोसायटी परिसरात सर्वप्रथम तपासणी करण्यात आली. त्यानंतर भोसा, लोहारा, वाघापुर आणि धामणगाव मार्गावर असलेल्या रेतीसाठ्यांचीही तपासणी करण्यात आली. यामध्ये बरेच रेतीचे साठे हे सगिर अन्सारी यांचे असल्याची माहिती पुढे आली. त्यावरुन सगीर अन्सारी यांना या रेतीसाठ्यासंदर्भात कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले असल्याची माहिती आहे. त्यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या सर्व रेतीसाठ्यांची मोजणी करुन त्याचा अहवाल लवकर महसुल विभागास सादर करावा असे सांगण्यात आले आहे. त्यावरुन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने बुधवार दि. ८ जुन रोजी रेतीसाठ्यांच्या मोज मापाचे काम सुरू केले आहे.

त्या रेतीसाठ्याचे व्हिडीओ व्हायरल शहरातील पांढरकवडा मार्गावर असलेल्या गुलमोहर सोसायटी परिसरात मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा करुन ठेवण्यात आला आहे. या रेती साठ्याचा व्हीडीओ गेल्या काही दिवसांपुर्वी व्हायरल झाला आहे. या व्हीडीओ च्या माध्यमातुन शहरातील अवैध रेतीसाठ्यांची माहिती उघड करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

लवकरच तपासणी ^शहरात कुठेही रेतीचा साठा करण्यासाठी यावर्षी परवानगी देण्यात आलेली नाही. गेल्यावर्षीचा काही शिल्लक असलेला रेती साठा वगळता इतर ठिकाणी रेती साठा असणे शक्य नाही. तरीही शहरात विविध भागात रेतीची साठवणूक केल्याची माहिती आली आहे. यानंतर इतर रेतीसाठ्यांचीही तपासणी लवकरच करण्यात येणार आहे. कुणाल झाल्टे, तहसीलदार.

बातम्या आणखी आहेत...