आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराळेगाव शहरात नियमबाह्य पद्धतीने देशी दारूचे दुकान सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहे. या बाबत माहिती होताच २ मार्च रोजी चुकीचे व खोटे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे, असे निवेदन महिलांनी दिले होते. मात्र कारवाई झाली नाही. त्यामूळे सोमवारी तत्कालीन मुख्याधिकारी यांनी दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द करावे, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्याधिकारी यांना देण्यात आले. नगरपंचायत राळेगाव हद्दीतील मनीष वाघमारे यांचे जागेत वॉर्ड क्र. ६ सर्वे न. ६०० येथे मुंबई येथील परवाना धारक उषा रेड्डी यांना या आधीच्या मुख्याधिकारी यांनी देशी दारूचे दुकान लावण्यासाठी दि. ९ सप्टेंबर २०२१ रोजी बेकायदेशीरपणे तरतुदीचे उल्लंघन करून ना हरकत प्रमाणपत्र दिले. विशेष म्हणजे दि. ३० नोव्हेंबर २०१३ रोजी तत्कालीन ग्रा. प. ने ठराव क्र. ८ नुसार भविष्यात देशी दारूचे दुकान लावण्यास परवानगी दिली जाणार नाही असा ठराव घेतला. त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. यात मोठा आर्थिक देवाणघेवाण होऊन तर हे ना हरकत प्रकरण करण्यात आले नाही ना, अशी शंका घेण्यास वाव असल्याचा आरोप निवेदन कर्त्यांनी केला. याबाबत निवासी जिल्हाधिकारी व राळेगाव प्रभारीनगरपंचायता मुख्याधिकारी माधुरी मडावी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राळेगाव येथील नगरसेवक बाळु धुमाळ, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रा. सारिका ताजणे, स्वामिनी जिल्हा दारूबंदी अभियानच्या मनीषा काटे, अॅड. रोशनी वानोडे, शीतल कुरटकर, चारुशीला जगताप, प्रणाली धुमाळ, आकाश कुरसंगे, प्रतिभा खुरसंगे, सविता दिनेश तोटे, नंदा घोटे, संगीता दत्ताजी चांदोरे, शीतल कन्नाके आदीं उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.