आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:24 जुलैपासून पाऊस ओसरल्यामुळे तापमानात वाढ; रात्री जाणवतो उकाडा

यवतमाळ15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुलै महिन्याच्या सुरूवातीपासूनच शहर व जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळला. जुलै महिन्यात ५०८. ९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. दरम्यान पाऊस सुरू असल्यामुळेच जुलै महिन्याच्या २३ तारखेपर्यंत शहरात तापमान कमी होते मात्र २४ जुलैपासून पाऊस ओसरला आणि तापमानात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मागील आठ दिवसातील कमाल तापमानाच्या नोंदी लक्षात घेता आठ दिवसात तापमानात तब्बल आठ अंशाने वाढ झाल्याचे दिसत आहे.

शहरासह विभागात गेल्या आठवड्यापासून पाऊस नाही, दुसरीकडे तापमानात वाढ होत आहे. श्रावणात जणू भाद्रपद महिन्यातील पितृपक्षाप्रमाणे कडक उन्हाचा तडाखा बसत आहे. आठ दिवसांपासून तर शहराचे कमाल तापमान दहा अंशांनी वाढून ३२ पर्यंत गेले. किमान तापमान २५ अंशांवर आहे. कमाल व किमान तापमानात केवळ आठ अंशांची तफावत आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण नसल्यामुळे ऊनाची तीव्रता जाणवत आहे. दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत तर असह्य उकाडा आणि शरीर घामाघूम होत आहे. काही दिवस उकाडा सहन करावा लागणार आहे.

पिकांसाठी मात्र मोकळे वातावरण पोषक
जुलै महिन्यात अतिपावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संपूर्ण महिनाभर पावसाची रिपरिप असल्यामुळे पिकांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला नाही. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली होती, आत मशागतीची कामे खोळंबली होती. मात्र आता वातावरण मोकळे असल्यामुळे पिकांसाठी सध्याची परिस्थिती पोषक आहे.

बातम्या आणखी आहेत...