आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका प्रशासनाकडून सर्वे:शहरातील ट्रॅव्हल्सचे अनधिकृत थांबे हटवून रस्ते नो पार्किंग झोन

यवतमाळ9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील प्रमुख मार्गांवर ठिकठिकाणी ट्रॅव्हल्स चालकांनी अनधिकृत थांबे तयार केले आहेत. हे सर्व थांबे हटवून शहरातील रस्ते ट्रॅव्हल्ससाठी नो पार्किंग झोन बनविण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहे. नुकत्याच पार पडलेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत त्यासंदर्भात निर्देश देण्यात आले होते. त्यावरुन आरटीओ, जिल्हा वाहतुक शाखा आणि पालिका प्रशासन यांच्या वतीने बुधवार दि. २३ नोव्हेंबर रोजी शहरातील रस्त्यांवर सामुहीक सर्वे करण्यात आला. त्याचा अहवाल लवकरच जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येणार आहे.

शहरातील दारव्हा मार्ग, पांढरकवडा मार्ग, आर्णी मार्ग आणि इतर प्रमुख मार्गांवर वाट्टेल त्या ठिकाणी रस्त्यावर ट्रॅव्हल्स उभी करुन प्रवासी बसमध्ये चढविणे आणि खाली उतरविणे हे काम अगदी राजरोसपणे सुरू असते. गेल्या कित्येक वर्षांपासुन ट्रॅव्हल्स चालकांकडुन सुरू असलेला हा प्रकार सर्वसामान्य वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मात्र दुसऱ्या गावाला जाणाऱ्या प्रवाशांना त्रास नको म्हणुन त्यासंदर्भात फारशी ओरड होत नव्हती. मात्र गेल्या काही वर्षात याचा फायदा घेत ट्रॅव्हल्स चालकांनी अतातायीपणा सुरू केला आहे. भर रस्त्यात तासनतास ट्रॅव्हल्स उभी करुन प्रवासी भरण्याचे प्रकार तर आता नित्याचेच झाले आहे. मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजुला सायंकाळी एका पाठोपाठ एक ट्रॅव्हल्स उभ्या करण्याची जणु स्पर्धाच सुरू असते.

निम्मी बस राहते रस्त्यावर दारव्हा मार्गावर असलेल्या एका ट्रॅव्हल्स पाँईंटवर उभ्या ठेवण्यात येणाऱ्या ट्रॅव्हल्स ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी चक्क रस्त्याच्या मध्यभागापर्यंत पुढे काढण्यात आलेल्या असतात. त्या ठिकाणावरुन निघाल्यानंतर अर्धा-अर्धा तास या ट्रॅव्हल्स रस्त्यावर उभ्या ठेवण्यात येतात. हा सर्व प्रकार पाच ते सहा वाहतुक कर्मचार तैनात राहणाऱ्या बसस्थानक चौकापासुन जवळच सुरू असतो.

इतर प्रवासी वाहनांचे काय ज्याप्रमाणे शहरातील प्रमुख मार्गांवर ट्रॅव्हल्स चालकांनी अनधिकृत थांबे बनवीले आहे त्याचप्रमाणे शहरातील अंतर्गत रस्त्यावर आणि काही मुख्य रस्त्यावर अवैध प्रवासी वाहतुक करणाऱ्या वाहनधारकांनी त्यांचे थांबे तयार केले आहेत. त्या ठिकाणी रस्त्यावर उभ्या करण्यात येणाऱ्या प्रवासीवाहनांचा त्रास इतरवाहनधारकांना सहन करावा लागतो. त्यामुळे त्यासंदर्भातही कारवाईची मागणी आता होत आहे.

बातम्या आणखी आहेत...