आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई‎:सोने कमी भावात देतो म्हणत‎ दरोडा; चौघांना केली अटक

यवतमाळ‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खोदकामात मिळालेले सोने कमी‎ किंमतीत देतो म्हणत दरोडा‎ टाकणाऱ्या चौघांना महागाव पोलिस‎ आणि एलसीबी पथकाने अटक‎ केली. ही कारवाई सोमवार, दि. २‎ जानेवारीला रात्रीच्या सुमारास‎ करण्यात आली असून सहा लाख‎ वीस हजार रूपयाची रोख हस्तगत‎ करण्यात आली. प्रवीण, रवी,‎ किशोर रा. लोणी आणि नंदकिशोर‎ रा. वारंगा फाटा अशी ताब्यात‎ घेण्यात आलेल्या तिघांची नावे‎ आहेत.‎ आर्णी शहरातील सुरेंद्र गावंडे वय‎ ३८ वर्ष या सराफा व्यावसायिकाने‎ दि. २३ डिसेंबरला महागाव पोलिस‎ ठाण्यात तक्रार दिली होती.‎

तक्रारीनूसार, गावंडे आणि त्यांच्या‎ मित्र सोबत नऊ आरोपींनी संपर्क‎ साधत खोदकामात सोन्याचे नाणी‎ सापडल्याचे सांगितले होते.‎ त्याचबरोबर पाहीजे असल्यास कमी‎ भावात देण्यात आमिष दाखविले.‎ यावेळी दीड किलो नाणी विक्री‎ करण्याचा २० लाख रूपयात सौदा‎ करण्यात आला. दरम्यान आरोपींनी‎ सराफा व्यावसायीक गावंडे यांचा‎ विश्वास संपादन करीत गावंडै‎ आणि त्यांच्या मित्राला नॅशनल‎ हायवे मार्गावरील नांदगव्हाण‎ शिवारात बोलावून घेतले. तसेच त्या‎ दोघांनाही मारहाण करीत त्यांच्या‎ जवळील २० लाखाची रोख जबरीने‎ हिसकावून पळून गेले.

त्यानंतर‎ एलसीबी पथक आणि महागाव‎ पोलिसांनी तपासचक्रे फिरवत‎ दरोडेखोरांची नावे निष्पन्न केलीत.‎ त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणाहून‎ सोमवारी या प्रकरणातील चौघांना‎ ताब्यात घेत त्यांच्याकडून ६ लाख‎ २० हजार रूपयाची रोख हस्तगत‎ केली. मंगळवारी पोलिसांनी त्या‎ चौघांना पोलिसांनी न्यायालयात‎ हजर केले असता, न्यायालयाने दि.‎ ६ जानेवारी पर्यंतची पोलिस कोठडी‎ सुनावली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...