आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेरबंद:दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद ; पुसद-वाशीम मार्गावर वसंतनगर पोलिसांची कारवाई,चौघांना पकडले

पुसदएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या चौघांना धारदार शस्त्रांसह वसंतनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई पुसद - वाशीम मार्गावर असलेल्या जमजम हॉटेलजवळ गुरूवार, दि. २ जूनला पहाटेच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी पाच जणांवर वसंतनगर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे. शेख मुश्ताक उर्फ फकिरा शेख लाल वय २९ वर्ष, रवी मारोती घोंगडे वय ३० वर्ष, संतोष विष्णू डाखारे वय २८ वर्ष, विशाल झाडे वय ३२ वर्ष सर्व रा. मानोरा जि. वाशीम अशी ताब्यात घेतलेल्या दरोडेखोरांची नाव आहे. या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, वसंतनगर पोलिस ठाण्यातील अधिकारी,कर्मचारी गुरुवारी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. अशात पोलिस कर्मचारी कुणाल मुंडोकार यांना पुसद- वाशीम मार्गावर असलेल्या जम जम हॉटेलजवळ दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देत पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हॉटेल परिसर गाठून मोठ्या शिताफीने चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दरोडा टाकण्यासाठी व प्रतिकार करण्याकरिता वापरली जाणारी लोखंडी रॉड, लोखंडी कटावणी, आरी, मिरची पावडर, मोबाईल आणि दुचाकी आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पाच जणांवर वसंतनगर पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले असून फरार एकाचा शोध सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वसंतनगर पोलिस करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...