आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:दिल्लीत वाशीम जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या रोहिणी इंगोलेचा सत्कार

वनोजा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर १५ ऑगस्ट रोजी आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने एक भारत श्रेष्ठ भारत इंडिपेंडन्स डे कॅम्प २०२२ राबवण्यात आला होता. वाशीम जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या रोहिणी इंगोलेचा सत्कार करण्यात आला.

पथक संचालनात वाशीम जिल्ह्यातील श्रीमती साळुंकाबाई राऊत कला व वाणिज्य महाविद्यालय वनोजा च्या एनसीसी विभागाची कॅडेट रोहिणी इंगोले हिची निवड करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्यातून ३६ कॅडेट्सची निवड करण्यात आली होती. हा कॅम्प १ ते १६ ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आला होता.

१५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर संपन्न झालेल्या कार्यक्रमात विविध देशातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या भारतातील विविध सांस्कृतिक परंपरा आणि पद्धतीची ओळख सांस्कृतिक उत्सवाच्या माध्यमातुन करून दिली या कॅम्पमध्ये त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डीजे एनसीसी लेफ्टनंट जनरल गुरुबीरपाल सिंह यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी प्राप्त झाली. ११ महाराष्ट्र बटालियन अकोलाचे कमांडिंग ऑफिसर कर्नल बिजॉय चौधरी व लेफ्टनंट कर्नल चंद्रप्रकाश भदोला तसेच श्रीमती साळुंकाबाई राऊत कला व वाणिज्य महाविद्यालय वनोजाचे प्राचार्य डॉ. देवेंद्र गावंडे, आणि लेफ्टनंट डॉ. सुनील बोरचाटे यांनी कॅडेट रोहिणीचा सत्कार करून तिचे अभिनंदन केले. या कॅम्प दरम्यान रोहिणी इंगोले हिला दोन बॅच तसेच गोल्डन सार्जंट रँकने सन्मानित करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...